Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमंत तो गं. पं. वाचनालय, भो व पंचांग हीं प्रकरणें अवश्य वाचावीं. भारतीय ज्योतिः शास्त्र या 1. पुस्तकाचाही बराच उपयोग होईल. मूळ ग्रंथकर्ते लोकमान्य टिळक यांनी हा सारांश प्रसिद्ध कर ण्यास परवानगी दिली याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांचे दोन्हीही ग्रंथ इंग्रजीत झाल्यामुळे मराठी वाचकांस त्यांचा लाभ होत नाहीं; तो व्हावा म्हणून हा प्रयत्न केला आहे. शेवटीं रा. रा. दामोदर सांवळाराम आणि मंडळी यांनी हे पुस्तक छापून प्रसिद्ध करण्याचें अंगावर घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानून, व ज्या वालवक्तृमंडळावरून हे पुस्तक लिहिण्याची बुद्धि झाली, त्याला चिरायु करण्याविषयीं विश्वनियन्त्या परमात्म्याची मनःपूर्वक प्रार्थना करून ही प्रस्तावना पुरी करितों. जगन्नाथाची चाळ, मुंबई । पौष वद्य १०, शके १८२९. के. ल. ओगले. 15 MAR 1990