Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११२
वेदकाल निर्णय

.

 आतां, दुसऱ्या चरणाचा सरळ अर्थ " नेदीयसाहून आमच्या घरीं ये " असा आहे. यांत नेदीयस् शब्दासंबंधानेंही घोटाळा झालेला आहे. ' अन्तिकचाढयोनेंदसाधौ' या पाणिनीच्या सूत्रांत [ ५ - ३-६३ ] अन्तिक शब्दाला ईयस् इष्ठ प्रत्ययांपूर्वी नेद असा आदेश होत असतो, असे सांगितलें आहे. परंतु अन्तिक- पासून नेद शब्द कोणत्याही रीतीनें मिळू शकत नाहीं. ह्मणून, नेदीयस् ह्या शब्दाचें मूळ रूप जें नेद तें पाणिनीच्या वेळीं नाहींसें झालें होतें, परंतु व्याकरणकार या नात्यानें पाणिनीला सर्व शब्दांची व्यवस्था लावणे भाग असल्यामुळे तो नेदीयस् याचा अन्तिक शब्दाशीं संबंध लावून देवून मोकळा झाला, असें ह्मणावें लागतें. पण असें ह्मटल्यानें नेदीयस् याचा पाणिनीच्या वेळीं जवळचा याखेरीज दुसरा कांहीं एक अर्थ नव्हता असे मानण्याचें कारण नाहीं. पाणिनीनें त्याच्या वेळीं विशेष प्रचलित असलेला त्याचा अर्थ घेतला असेल व त्याचें मूळरूप कांहीं नाहीं असें पाहून त्यानें तसाच अर्थ असलेल्या अन्तिक शब्दाला त्याचें मूळरूप मानिले असेल. कारण त्याचा उद्देश अर्थ सिद्ध करण्याचा नसून रूपसिद्ध करण्याचा आहे. इंग्रजीत (nether ) नेदर असा शब्द आहे, व त्याचा खालचें असा अर्थ आहे. हा शब्द नेद या शब्दाला अर हा तारतम्यदर्शक प्रत्यय लावून झालेला आहे, व तो लो- अर ( low-er ) या शब्दाशीं समानार्थक आहे. याच मूळ शब्दावरून beneath I बिनीथ–खालीं ] under-neath (अंडर-नीथ) वगैरे शब्द झाले आहेत. हा नेदर शब्द व संस्कृत नेदीयस् हे दोन्ही नेद