नाहमिन्द्राणि रारण॒ सख्यु॑र्वृषाक॑पेऋ॒ते ।
यस्ये॒द॒मप॑यं॑ ह॒विः प्रि॒यं दे॒वेषु गच्छ॑ति॒ विश्व॑० ।। १२ ।।
( ही ऋचा इन्द्राची आहे. )
अर्थः - हे इन्द्राणि ( माझा ) सखा जो वृषाकपि त्याच्या- शिवाय मला चैन पडत नाहीं. त्याचें हें आवडतें जलपूत हवि देवांकडे जातें. इन्द्र विश्वाच्या० इ० ॥ १२ ॥
वपा॑कपाति॒ रेव॑ति॒ सुषु॑त्र॒ आदु सुस्नु॑षे ।
घस॑त्त॒ इन्द्र॑ उ॒क्षण॑ प्रि॒यं चित्क॒रं ह॒विर्वश्व॑० ॥ १३ ॥
( या ऋचेत वृषाकपायि या शब्दानें घोटाळा उडविलेला आहे. वृषाकपायि ह्मणजे वृषाकपीची आई असे कित्येक समजतात; व कित्येक वृषाकपीची पत्नी असे समजतात. ही ऋचा इन्द्राणीला उद्देशून असल्यामुळे दुसरा अर्थ घेतल्यास वृषाकपि ह्मणजे इन्द्र असे समजलें पाहिजे. मागील ऋचेंत सांगितलेले वृषाकपीचें आ- वडतें हवि खाण्यासाठीं इन्द्र इन्द्राणीजवळ परवानगी मागतो. )
अर्थ :- हे धनवति सुपुत्रे व चांगली सून असलेले इन्द्राणि, या तुझ्या इन्द्राला वृषभरूपी सुखकर व आवडतें हवि भक्षण करूं दे; ( कारण ) इन्द्र विश्वाच्या इ० ॥ १३ ॥
उ॒क्ष्णोहि मे पञ्च॑दश साकं पच॑न्ति वि॑श॒तिम् ।
उ॒ताहम॑झ पीव॒ इदु॒भा कुक्षी पृ॑णन्ति से विश्व॑० ॥ १४ ॥