१०५
यमि॒मं त्वं॑षु॒षाक॑पि॑ प्रि॒यमन्द्राभि॒ रक्ष॑सि ।
श्वान्व॑स्य ज॑भिष॒ददा॑प॒ कर्णे वराह॒युर्विश्व॑० ॥ ४ ॥
प्रि॒या त॒ष्टानि॑ मे क॒पिये॑क्त॒ा व्य॑दुषत् । शिरो न्व॑स्य राविषं॒ न सु॒गं दुष्कृते' भुवं विश्व॑० ॥ ५ ॥
( दुसन्या ऋचेत, इन्द्राच्या वृषाकपीविषयींच्या आवडीबद्दल इन्द्राणी त्याजवर रागावली. परंतु एवढ्यानें तिची तृप्ति न होऊन ती त्यास आणखी ह्मणते. )
अर्थः– हे इन्द्रा, ज्या अर्थी तूं आपल्या प्रिय अशा वृषाकपीचें रक्षण करतो आहेस त्या अर्थी वराहाची इच्छा करणारा कुत्रा त्याच्या कर्णाचा चावा घेवो... ( कारण, ) या कपीनें माझे आव- डते आज्ययुक्त पदार्थ नासून टाकिले. ( ह्यणून ) खरोखर मीं त्याचें डोकं नुकतेंच कापून टाकले आहे; कारण दुष्कृति करणा- राला सुख होऊं नये, इंद्र विश्वाच्या इ० ॥ ४, ५ ॥
[ आकृतीत दाखविल्याप्रमाणे मृगशीर्षाचा आकार कल्पिल्यास मृगाच्या कानाचा चावा घेणारा कुत्रा ह्मणजे कॅनिस मेजर ( श्वान ) ऊर्फ व्याध होय हें सहज समजेल. ]
न मन्त्री मु॑य॒सत्त॑रा न सुयाहु॑तरा भुवत् ।
न मत्प्रतिच्यवीयसी न सक्थ्युमीयसी विश्व॑० ॥६॥
( यांत इन्द्राणी आपली धन्यता मानून घेते आहे. ती ह्मणते ).