Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०: तात्पर्य, वेदकालासंबंधानें टिळकांनी घातलेल्या मर्यादा आतां सर्वोस ग्राह्य झाल्या आहेत. दुसन्याही अगदीं निराळ्या गोष्टींवरून जर्मनींतील बान युनिव्हर्सिटींतील डाक्टर जाकोबी यानें हींच अनु- मानें काढिलीं* आहेत. शिवाय आपले कडील विद्यमान ज्योति:- शास्त्रविशारद रा. रा. वें. बा. केतकर यांनीं तैत्तिरीय ब्राह्मणांतील [ ३, १, १५ ] " बृहस्पतिः प्रथमं जायमानः तिष्यं नक्षत्रं प्रादुर्बभूव " । या वचनावरून त्याचें गणित करून बृहस्पतिकृत तिष्य नक्षत्राच्या अधिक्रमणाचा काळ इ. स. पूर्वी ४६५० वर्षे असा काढिला आहे. याही गोष्टीवरून त्या अनुमानास आणखी बळकटी येते. आतां यापुढें मोक्षमुल्लर, हो वगैरे लोकांनी काढ- लेल्या वेदकालावर आपणांस मुळींच भिस्त ठेवावयास नको. असो. अशा प्रकारचें पुस्तक मराठी वाचकांस जरासें कठीण वाट- ण्याचा संभव आहे. परंतु खरोखर तें कठीण नाहीं. कारण हैं समजण्याला ज्योतिः शास्त्राची जरी माहिती थोडीशी पाहिजे, तरी गणिताची त्यामध्यें मुळींच भानगड नाहीं. कांहीं ज्योतिःशास्त्र- विषयक नांवांचे अर्थ मीं टीपांत दिलेले आहेतच. त्यावरून एकंदर मजकूर समजण्यास सुलभ होईल. तरी यासंबंधानें कै· दीक्षितां- च्या ज्योतिर्विलास नांवाच्या पुस्तकाची पहिलीं कांहीं प्रकरणें वाचर्णे सोईचें होईल. त्यांत विशेषतः दिव्य भ्रमण, देवांची मंदिरें,

  • आर्क्टिक होम इन् घि वेदाजूची प्रस्तावना पान १ पहा.