लोक हे जेव्हां एकमेकांपासून विलग्न झाले तो काल इ. स. पूर्वी
२५०० वर्षीच्या पलीकडचा असला पाहिजे. आतां ग्रीक तत्व-
वेत्ता आरिस्तातल ( इ. स. पूर्वी ३२० वर्षे ) हा तर याच्याही
पलीकडे जाऊन म्हणतो कीं झोरोआस्टर हा प्लेटोच्या पूर्वी ५०००
किंवा ६००० वर्षे होऊन गेला. आतां हा आंकडा जरी अगदी
निश्चित असा मानिला नाहीं, तरी त्यावरून आरिस्तातलच्या वेळीं,
झोरोआस्तर हा फार प्राचीन काळीं होऊन गेला अशी समजूत
होती, एवढे उघड दिसतें. आतां झोरोआस्तर जर इतका
प्राचीन असेल तर उघडच वेद त्याच्याहूनही प्राचीन असले
पाहिजेत. दुसरी एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे कीं
ग्रीस देशामध्ये होमर कवीनें इलियड हें काव्य इ. स. पूर्वी १०००
वर्षीच्या सुमारास रचिलें. ..आतां इलियड व वैदिक ग्रंथ यांच्या
भाषा तर इतक्या भिन्न आहेत की, या दोन ( ग्रीक व हिंदु ) लो-
कांची फाटाफूट झाल्यावर दोघांच्या भाषांमध्ये इतकें भिन्नत्व याव-
यास हजारों वर्षे लोटलीं असली पाहिजेत. ह्मणून ओरायन अथवा
मृगशीर्ष यांच्या गोष्टी रचल्या गेल्यानंतर व वसंतसंपात कृत्तिकांत
येण्यापूर्वी, ह्मणजे इ. स. पूर्वी ३५०० ते ३००० वर्षांच्या सुमा-
रास, ग्रीक व हिंदु यांची फाटाफूट झाली असें ह्मणणें अगदर्दी
रास्त होईल.
सरते शेवटीं, आपल्या अति कुशाग्र बुद्धीच्या व महाविद्वान्
ब्रह्मविदांचें व पंडितांचें, वेद हे अगदी अनादि अतएव इश्वरदत्त