आहे. पूर्वी आपला श्रावणीचा विधि भाद्रपदांत होत असे असं
मनुस्मृतीवरून दिसतें. तेव्हां पावसाळाही याच महिन्यापासून सुरु
होत असे. कारण श्रावणीचा विधि वर्षाकालाच्या आरंभी झाला
पाहिजे असे आश्वलायन गृह्यसूत्रांवरून दिसतें [ आ. गृ. सू.
३-५-२. ]. पण पुढें तो श्रावणांत होऊं लागला. कारण संपात -
चलनामुळे पावसाळा एक महिना मागें हटला. तो तसाच आणखी
हटत आतां तर ज्येष्टापर्यंत आला आहे. या गोष्टीवरून पहातां
ऋतूंच्या कालांत झालेल्या फेरफारांच्याही खुणा आपल्या वाङ्मयांत
कांहीं अंशीं सांपड़तात, असें ह्मणावयास हरकत नाहीं. तरी पण
या पुराव्याला, वर्षारंभांत झालेल्या फेरबदलांच्या पुराव्या इतकें
महत्व देतां येत नाहीं. कारण ऋतु हे स्थानपरत्वें भिन्न भिन्न
• काळींही होत असतात. असो.
आतां इतकेंच पहावयाचें उरलें कीं, इतक्या प्रमाणावरून ठर-
विलेला वेदकाल प्राचीन व अर्वाचीन विद्वानांच्या मतांशीं अविरुद्ध
आहे कीं नाहीं ? जर्मन पंडित वेबर यानें भूगोलविषयक व ऐति-
हासिक पुराव्यावरून असे अनुमान काढले आहे कीं, भारतीय वाङ्म-
* ( अ० ४; ९५ ) श्रावणीच्या विधीचे दोन भाग जे उपाकर्म व
उत्सर्जन त्यांचे दोन काल विकल्पकरून, मनुस्मृतींत दिले आहेत. ते असे—
" श्रावण्यां प्रौष्ठपद्यां वाप्युपाकृत्य यथाविधि | युक्तश्छंदास्यधीयीत मासा-
विप्रोऽर्घपंचमान् ॥ पुष्ये तु छंदसां कुर्याद्वहिरुत्सर्जनं द्विज
।
माघशुक्लस्य
वा प्राप्ते पूर्वाह्णे प्रथमेऽहनि ॥” प्रौष्ठपदी झणजे भाद्रपदी पौर्णिमा. हा का
लाचा विकल्प शाखानुरोधानें आहे असें टीकाकार लिहितात.