Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४
वेदकाल निर्णय.

होऊन उत्तरायण धनिष्टांच्या आरंभीं आलें होतं. स्थिति ह्मणजे अश्विनींत वसंतसंपात आला तेव्हांची. वेदांगज्योतिषापेक्षांही एक पंधवडा मागें आले होते. प्रकारचा योग्य तो फेरफार पंचांगासंबंधानें घडवून आणण्याचा प्रयत्न विश्वामित्रानें केला. महाभारतांत आदिपर्वामध्ये विश्वा- मित्रानें प्रतिसृष्टि निर्माण करण्याचा व नक्षत्रमाला धनिष्ठांच्या ऐवजीं श्रवणापासून सुरु करण्याचा प्रयत्न केला असें वर्णन आहे. इतर पुराणांतही ही गोष्ट दिली आहे व त्यांत विश्वामित्रानें एक नवीन आकाश उत्पन्न करण्याचा विचार केला असें वर्णिलें आहे. त्याचा अर्थ इतकाच कीं, विश्वामित्रानें पंचांगाची नवीन परिस्थितीप्रमाणे सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, पण तो सिद्धीस न जातां पूर्वीची ह्मणजे कृत्तिकांपासून नक्षत्रांस आरंभ करण्याचीच पद्धत कायम राहिली. पण शेवटीं कांहीं दिवसांनीं आणखी फेरफार होऊन नक्षत्रांस अश्विनीपासून आरंभ करण्याची पद्धत सुरु झाली.

 याप्रमाणें संपातचलनाविषय क्रमानें एकसारखे उल्लेख आपल्या वाङ्मयामध्यें सांपडत असल्यामुळे वेदांच्या प्राचीनत्वाविषयीं कांहीं तरी तर्क करीत बसणें आतां रास्त होणार नाहीं. फल्गुनीपूर्णमासी ज्या काळांत वर्षारंभ होत असे त्या काळाची स्मृति भाद्रपदांतील पितृपक्षावरून आपल्याला होते, या विषयीं मागे विवेचन आलेंच

 + चकाराभ्यं च वै लोकं क्रुद्धो नक्षत्रसंपदा | प्रतिश्रवणपूर्वाणि नक्षत्राणि चकार सः ॥ आदिपर्व, ७१-३४.