Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२
वेदकालनिर्णय.

वर्षे ह्मणजे कांहींच नाहीं असें होतें. तरी स्थूल मानानें ते बरो- बरच आहेत. या सर्वात जुना जो अदितिकाळ त्या वेळी पंचां- गाची अवश्यकता उत्पन्न झाली होती; व यावरून हाच काळ आर्यसुधारणेचा आरंभ नसून ती यापूर्वी किती तरी काळ सुरु झाली असली पाहिजे, हें उघड होतें. दुसरा जो मृगशीर्षकाळ तो इ. स. पूर्वी ४००० पासून २१०० पर्यन्त येतो. या वेळीं पारशी, ग्रीक आणि भारतीय आर्य हे एकत्र रहात असत व ह्मणून हे तीन लोक वेगळे होण्यापूर्वीही कांहीं वेदाचा भाग तयार झाला होता असें साहजिक अनुमान होतं. या अनुमानाला तुलनात्मक व्युत्पत्तिशास्त्रावरून चांगला आधारही मिळतो. पुराणकथांतील सुमारें साठ नांवें ग्रीक व संस्कृत भाषांत सारखींच आहेत असें मॅक्समुल्लरने दाखविलें आहे. इतकीं नांवें जर दोघांना समान आहेत, तर त्या नांवांच्या देवांचीं कृत्यें वर्णन करणारी सूक्ते त्या काळीं नसावीं असें संभवत नाहीं. हे तीन लोक विभक्त होण्यापूर्वी कविताही उत्पन्न होऊं लागली होती हें श्लोकचरणवाचक संस्कृत पद, अवेस्तिक पध व ग्रीक पौस या शब्दांवरून उघड होईल.

 अयनचलनामुळें वर्षारंभ दोनदां बदलला गेला असें जर आहे, तर त्या वर्षारंभांच्या मधल्या स्थितीविषयीं, तसेंच ऋतुकालामध्ये झालेल्या बदलाविषयीं कोठें कांहीं उल्लेख आढळत नाहींत हैं कसें ? व वैदिक लोकांनां अयनगति त्या वेळी समजली नाहीं कशी ? असे प्रश्न कोणी विचारील. पण त्यांचें समाधान करणे फारसें कठणि नाहीं. संपातगति समजण्यास गाणतााद शास्त्रांचीही थोडीशी