८७
हायणामध्ये सापडलेल्या गोष्टींसारख्या गोष्टींचा काही पत्ता ला-
गेल. तरी पण यज्ञग्रंथांत पुनर्वसूंच्या प्राचीन स्थितीच्या कांहीं
खुणा आहेत. अदिति ही पुनर्वसूंची अधिष्ठात्री देवता आहे; आणि
ऐतरेय' ब्राह्मण व तैत्तिरीयसंहिता यांमध्यें असें सांगितलें आहे
कीं " अदितिपासून सर्व यज्ञांना आरंभ व्हावा, व अदितिबरोबरच
त्यांची समाप्ति व्हावी, असा तिला वर मिळालेला आहे." यज्ञ
देवांपासून निघून गेला, तेव्हां त्यानां कांहीं विधि करितां येईनासे
झाले. व तो कोठें गेला असावा हेंही त्यांना समजेना. अशा
स्थितींत अदितीनं देवांनां मदत करून यज्ञारंभ करून दिला;
व ह्मणून वर सांगितलेला वर तिला मिळाला आहे. याचा अर्थ
असा कीं या काळाच्या पूर्वी यज्ञ वाटेल तेव्हां करीत असत; परंतु
तेव्हांपासून ते अदितीपासून करावे असे ठरवून टाकिलें. ह्मणजे
अदिति ही यज्ञाची ऊर्फ संवत्सराची आरंभक झाली. वाजसनेयी
संहितेंत ( ४. १९ ) अदितीला ' उभयतः शीष्ण ' ह्मणजे " दो-
होंकडून डोकें असलेली " असे म्हटले आहे; आणि हीं डोकीं
ह्मणजे अदितीपासून आरंभ होणाऱ्या व अदितीपाशीं संपणाऱ्या
यज्ञांचीं टोकं होत, असा अर्थ टीकाकारांनी दिला आहे.
+ यज्ञो वै देवेभ्य उदकामत्ते देवा न किंचनाशक्नुवन्कर्तुं न प्राजानंस्ते
ऽब्रुवन्नदितिं त्वयेमं यज्ञं प्रजानामेति सा तथेत्यब्रवीत्सा वै वो वरं वृणा इति ।
वृणीष्वेति सैतमेव वरमवृणीत मत्प्रायणायज्ञाः संतु मदुदयना इति तथेति ।
( ऐ. ब्रा. १-७ ).