Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वेदकालनिर्णय.

आतां हे उघडच आहे कीं, पितृयानामध्यें कोणतींही देवकर्मों व यज्ञ होत नाहींत. ज्या अर्थी मृग नक्षत्र सूर्यास्ती उगवू लागले ह्मणजे पितृयानाला आरंभ होत असे, त्या अर्थी वृषाकपीच्या यो- गानें यज्ञ बंद पडणें हें योग्यच आहे. त्याच्यामागें कुत्रा लावून दिला आहे या गोष्टीवरून त्या नक्षत्राची ओळख पटण्याला आतां उशीर लागणार नाहीं. हा कुत्रा ह्मणजे श्वानपुंजच होय. आतां यापुढे उघडच वृषाकपि दक्षिणायनांत गेल्यामुळे खालीं गेला व पुढें वसंतसंपातांत पुनः आल्यावर ह्मणजे देवयानांत आल्यावर वर ह्मणजे उत्तरेकडे असलेल्या इन्द्राच्या घरी आला. मग अर्थातच नूतनवर्षारंभ झाल्यामुळे यज्ञयागांनांही सुरुवात होते. आतां या वेळीं हैं नक्षत्र सूर्योदयीं उगवूं लागल्यामुळे अ- र्थात्च तें दिसेनासें झालें. ह्मणजे सूर्य इन्द्राच्या घरीं ह्मणजे उद- गयनांत शिरल्यावर तो द्वाड मृग नाहींसा झाला. अशा रीतीनें वृषाकपिरूपी सूय ह्मणजे शरत्संपातांतील सूर्य असें मानिल्यास या सूक्ताचा बराच समाधानकारक व सरळ अर्थ लागतो. यावरून या सूक्तामध्ये मृगशीर्ष व श्वानपुंज यांचेंच वर्णन केवळ आहे असे नाहीं, तर सूर्य ज्यावेळी विषुववृत्ताच्या दक्षिणेस किंवा उत्तरेस येऊं लागतो तेव्हांची त्याची स्थितीही त्यांत स्पष्टपणें वर्णिली आहे. या गोष्टीशीं ऋभूंची गोष्ट जोडली ह्मणजे आपणाला या गोष्टी जेव्हां रचल्या गेल्या तो काळ निश्चित करण्याला बिनचूक व खात्रीलायक पुरावा मिळतो. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास तैत्तिरीय संहिता व ब्राह्मणे यांत दिलेले प्राचीन वर्षारंभ केवळ काल्पनिक नसून