उत्तरयोः [ फल्गुन्योः ] आदधीत ॥ एषा वै प्रथमा रात्रिः संव- त्सरस्य । यदुत्तरे फल्गुनी । मुखत एव संवत्सरस्याग्निमाधाय 14 वसीयान् भवति " [ तै. ब्रा. १ - १ - २ ] या तैत्तिरीय ब्राह्म- १-१-२ णांतील वाक्यामध्यें पूर्वाफल्गुनी संवत्सराची शेवटची रात्र व उत्तरा- फल्गुनी ही पहिली रात्र असें झटले आहे. यावर दीक्षित म्हण- तात', " वेदकालीं महिने चांद्र होते; तेव्हां वर्षारंभ चांद्रमासाच्या आरंभ होत असे हें उघड आहे. तेव्हां वरील वाक्यांतील पूर्वा. फल्गुनी हें चांद्रमासाचें शेवटचें नक्षत्र आणि उत्तराफाल्गुनी हें पुढील मासाचें आरंभींचें नक्षत्र आहे हे उघड आहे." हे मास पूर्णिमान्त होते असें दीक्षितांचे मत आहेच. आतां पूर्णिमेला चंद्र उत्तराफल्गुनीवर असतांनां जर वर्षारंभ होतो तर हा वर्षारंभ कोणत्या प्रकारचा असुला पाहिजे ? सूर्य त्या वेळीं उत्तराभाद्रपदां- व जर हा वर्षारंभ वसंतारंभींचा असेल तर वसंतसंपात उत्तराभाद्रपदांत आला; म्हणजे जवळ जवळ आजची स्थिति किंवा सुमारें २१००० वर्षीमागची स्थिति आली. पण तै. ब्रा. काल इतका जुना आहे असें दीक्षितांस कधींही कबूल असणार नाहीं. अर्थात् हा वर्षारंभ वसंतारंभींचा नव्हे; उद्गयनाबरोबर- चाच असला पाहिजे. आतां तैत्तिरीय संहितेंतील संवत्सर सत्रांत दिलेल्या तीन वर्षारंभाच्या विचारावरून, फल्गुनी- पूर्णमासीं होणारा वर्षारंभ त्या वेळीं चालू नसून त्याच्या जवळ असणार. + भा. ज्यो. पा. १३३.
पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/१०
Appearance