Jump to content

पान:वेदकालनिर्णय.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. ७७ 'बृहस्पति प्रथम तिष्य ह्मणजे पुष्य नक्षत्राजवळ उत्पन्न झाला' असें वर्णन आहे. व अजूनही गुरुपृष्य योग हा फार मंगल समजतात. आतां खुद्द *ऋग्वेदासंबंधाने पहावयाचें. यज्ञामध्ये लागणाऱ्या दोन पात्रांना शुक्र व मंथिन् अशी नावे आहेत. वर एके ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ही नावें पात्रांना आकाशस्थ गोलांच्या नावावरून पडली असावी असे दिसते. वार्षिक सत्र ह्मणजे सूर्याच्या वार्षिक गंतीची प्रतिमाच होय. ह्मणून यज्ञांतील वस्तूंना नक्षत्र ग्रहादिकांची नांवे देणे अगदी स्वाभाविक होते. वरील पात्रांना शुक्राचे पात्र मथिन्चें पात्र असेंही तैत्तिरीय संहितेंत म्हटल आहे. आतां शुक्र व मंथिन वगैरे शब्दांचा सोमरस किंवा दुसरा एखादा अर्थ घ्यावयास काही आधार नाही. यास्तव ती नांवें ग्रहांचीच होत यांत संशय नाही. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळांत वेनाचे एक सूक्त आहे. वेन शब्द वेन् किंवा विन् (प्रीति करणे) या धातूपासून निघाला आहे. त्याच्या सूक्तामध्ये, " सूर्याचा पुत्र," " ऋताच्या अग्री," " लाटेसारखा समुद्रां-14exy तून येतो" अशी तत्संबंधानें है वाक्ये आहेत. यावरून वेन हे नांव व्हीनस् शब्दाचे मूळ आर्यरूप असावे असे दिसते. शुक्रग्रहवाचक

  • ऋ. सं. ४-५०.४ यांत, 'बृहस्पतिः प्रथम जायमानो महो ज्योतिषः परमे व्योमन् ।। असें तै. ब्रा. तील वरील वचनासारखेंच वचन आले आहे. $ सूर्यस्य शिशुम् ( १०, १२३. १); ऋतस्य सानौ ( १०, १२३, २); समुद्रादूमिमुदियति वेनः (१०, १२३, २);