केव्हा थांबणार? अशी अनेक प्रश्नचिन्हे निर्माण करणारे हे पुस्तक सामाजिक जागृतीचा व भावसाक्षरतेचा अक्षर ग्रंथ होय. महाविद्यालये, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अशी पुस्तके आता पाठ्यपुस्तके व्हायला हवीत, तरच समाज बदलू शकेल. तरुणाईपुढे विधायक कार्यक्रम आले, तरच समाजहिंसा थांबेल.
किरण बेदी यांनी समाज बळींच्या बोचच्या आत्मकथा सादर करून वास्तववादी साहित्यशृंखला बळकट केली आहे. यातला सामूहिक आक्रोश आपण कान भरून ऐकला पाहिजे. मन भरून विचार केला पाहिजे व समाज परिवर्तनात आपली सक्रिय भागीदारी निश्चित केली पाहिजे. आपल्या निष्क्रियतेमुळे व्यवस्था मोकाट होईल, तर आपणही केव्हा तरी असे मुकाट, मौन, मतिगुंग बळी ठरू. या ग्रंथाचे जागोजागी सामूहिक वाचन झाले, तरच समाज भावसाक्षर होऊन जुलमी व्यवस्थेस लगाम बसेल. या ग्रंथ प्रपंचामागे किरण बेदींचा होराही हाच आहे.
लेखक - किरण बेदी
अनुवाद - लीना सोहनी
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे