पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिसरी ओळ काव्याला पूर्णत्व देते. प्रारंभिक दोन ओळींत विषय विस्तार असतो. तिस-या सारस्वत ओळीत निष्कर्ष, पूर्णत्व भरलेले असते. हा त्रिवेणी संगम छंदास पूर्णता बहाल करतो.

 'त्रिवेणी'बद्दल गुलजारांच्याच शब्दात सांगायचे झाले तर म्हणता येईल, ‘सिर्फ एहसास है ये, रुह से महसूस करो (या आहेत फक्त जाणिवा. त्या तुम्हास आत्मिक अनुभवांनीच समजतील.) त्रिवेणी गुलजारांनी हिंदीत लिहिलेले त्रिपदी काव्य होय. जीवन जाणिवांची आत्मिक प्रचिती देणा-या या त्रिवेणी तुम्हास मनुष्य जीवनाची किती तरी शोभादर्शकीय बिंबे दाखवतील. प्रेम, प्रणय, विरह, मीलन, फाळणी, जगणे, विकास, शोषण, नाती, इच्छा, आकांक्षा, पर्यावरण कोणते विषय या त्रिवेणी आपल्या कवेत नाही घेत? दुथडी भरून वाहणा-या नदीप्रमाणे या त्रिवेणी सारा आसमंत आत्मसात करताना दिसतात. या त्रिवेणी कधी अगदी सोप्या, सहज असतात.
 जिन्दगी क्या है जानने के लिए
 जिन्दा रहना बहुत जरूरी है।
  आज तक कोई भी रहा तो नहीं।
 मरण अटळ आहे. खचित म्हणून का जगण्याचा आनंद हरवायचा? यांची रचना सोपी असली, तरी त्या तुम्हास सतत बेचैन करीत राहतात. वाचकास अंतर्मुख करण्याची प्रचंड ताकद घेऊन येणा-या त्रिवेणी हर्ष, शोक, आश्चर्य सारे भाव निर्माण करतात. या त्रिवेणीत समकालीन बोध असतो. एका अर्थाने त्या काव्यात वर्तमानाची व्याख्याच असते.
 भीगा भीगा सा क्यों है यह अखबार
 अपने होकर को कल से चेंज करो ।
  ‘‘पाँच सौ गाँव बह गये इस साल।
 मथळा वाचून विकल झालेला कवी, पेपरवाला बदलून अश्रू, रक्तांनी भरलेली वर्तमानपत्रे थोडीच बदलणार. त्यासाठी गरज आहे समजा, मन बदलण्याची, दस-यांची दु:खे आपली म्हणून कवटाळणारा हा कवी साने गुरुजींइतकाच भावुक. वर्तमान युगात माणसांचे जगणे क्षणाक्षणाने मृत्यूच्या दाढेत जाणे झालेय. त्याचे चित्रण करताना कवीने केलेले व्यंग कोण नाकारेल.
 न हर सहर का वो झगडा, न शव की बैचेनी
 न चुल्हा जलता है घर में,
  न आँखें जलती है।
  मैं कितने अमन से घर में उदास रहता हूँ।

जगण्याच्या परवशतेने माणसाला निष्क्रिय निर्जीव करून टाकले आहे. गुलजारांच्या त्रिवेणी प्रेम प्रणयाचा सुगंधही घेऊन येतात. कधी कधी त्या विरहाचा धूपही घालतात.

वेचलेली फुले/७२