पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पिकतो रस गळतो' सारखी लोकपरिचित व प्रचलित गीतांचा चपखल उपयोग ही नाटककार चित्रेची चतुराई व विलक्षणपणाची साक्ष होय. 'सोंगाड्या', ‘कथा अकलेच्या कांद्यांची', 'गाढवाचं लग्न' सारख्या लोकनाट्यातील द्वयर्थी रचना एकाच वेळी बुद्धिजीवी व सामान्य प्रेक्षकांना साद घालतील व दाद मिळवतील. त्याचं सुयोग्य सादरीकरण होणे मात्र गरजेचे. नांदी ते भरतवाक्य या नाट्य प्रवासात पद, पोवाडे, लोकगीतं, कवितांचा स्वैर वापर करून नाटककाराने ते रंजक होईल असे पाहिले आहे. शिवाय त्याच्या संहितेत दिग्दर्शकाला स्वातंत्र्य घेण्यास भरपूर वावही ठेवला आहे. सहदेव दुबे यांचा प्रयोग हा वस्तुपाठ असला तरी तो गिरवलाच पाहिजे असे बंधन नव्या दिग्दर्शकास नाही. संगीतासही, शास्त्रीय, पारंपरिक (लोक) पाश्चात्य सर्वास वाव आहे. प्रयोग व सादरीकरणाच्या दृष्टीने ते मुक्त नाट्य होय नि म्हणून ‘नाटक' संहिता म्हणून त्याचे मोठे मूल्य आहे.
 स्त्रीला स्वत:तील सुरुंग शक्तीची जोवर जाणीव होणार नाही, ती क्रियात्मक होणार नाही, तो ती पुरुषी व्यवस्थेची गुलामच राहणार, पुरुषी वासनेचे साधनच राहणार हे सांगणारे नाटक विचार म्हणून मात्र पोपटपंचीच करणारे जुने पुराणे वाटते.


• मिठू मिठू पोपट (नाटक)
 लेखक - दिलीप पुरुषोत्तम चित्रे

♦♦

वेचलेली फुले/६७