शिक्षकांना माँटेसोरी माहीत होणे अनिवार्य असल्याने या पुस्तकाशिवाय त्यासाठी दुसरा पर्याय नाही.
संस्कारक्षम ललित साहित्याची उणीव भरून काढण्याच्या उद्देशाने लिहिलेले छोटेखानी पुस्तक ‘जय मंगलमूती'. रा. वा. शेवडे गुरुजींसारख्या मुलांसाठी सातत्याने लिहिणाच्या लेखकाच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेली ही पुस्तिका गणेशाच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आपणापुढे ठेवते. या पुस्तिकेतून शेवडे गुरुजींनी गणेशाचे मानवीकरण करून ईश्वरातील आदर्श माणसात आल्यास माणसाचा देव व्हायला वेळ लागणार नाही, असा आशावाद अप्रत्यक्षपणे व्यक्त केला आहे.
गणपती हा आपल्या पूजेचा व आराधनेचा विषय. देव्हा-यातच त्याचे स्थान. पण त्याच्या जीवनातील मातृभक्ती, चातुर्य, बुद्धिमत्ता आपल्या जीवनात आली, तर आपले हृदयगर्भ देव्हारा झाल्याशिवाय राहणार नाही, हे पुस्तक वाचताना सतत जाणवते. अशी निर्माण होणारी जाण या पुस्तकाच्या उद्देशाची सफलता होय.
हे पुस्तक संस्काराच्या दृष्टीने अधिक उपयुक्त व्हावे म्हणून प्रात:स्मरण, गणेश आरती, मलपृष्ठावर मंगलाष्टक आदी देऊन लेखकाने औचित्य साधले आहे.
लेखक - रा. वा. शेवडे गुरुजी,
प्रकाशन - चंद्रकांत शेट्ये प्रकाशन मंदिर, कोल्हापूर
पृष्ठे ९८ किंमत २५ रुपये
जय मंगलमूर्ती : रा. वा. शेवडे गुरुजी
पृष्ठे : ५५ किंमत ८ रुपये
♦♦