पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/212

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आकर्षक मुखपृष्ठाने संवादाचे सारे विश्व सांकेतिक चिन्हांनी प्रतिबिंबित केले आहे. या प्रतिबिंबात माणूसही एक चिन्ह होऊन गेल्याचे दाखवून कलाकाराने तंत्रज्ञानावर संवेदना हाच उतारा होय, हा विचार समर्पक नि सार्थकपणे चितारला आहे. वजनरहित कागद, वाचन सुलभ टंक (फाँट) वाचनकेंद्री सजावट, विषय केंद्री लेख विभाजन, अक्षर रचना, यातून उभे राहणारे निर्मिती मूल्य या ग्रंथास ‘सकाळ' प्रकाशनाचे पारंपरिक श्रेष्ठत्व प्रदान करते.

 ‘संवादक्रांती' ग्रंथ संवाद क्षेत्रातील मन्वंतराच्या पाऊलखुणा रेखाटणारा नि भविष्याचे भान देणारा ग्रंथ होय. तो आपणास समजावतो की, 'वर्तमानपत्रांनी वाचणारा समाज घडवला, रेडिओने ऐकणारा, टीव्हीने पाहणारा, दर्शकांचा तर इंटरनेटनी जोडलेल्या सोशल साइट्सनी प्रत्येक जण आशयाची निर्मिती करेल.' हे जरी खरे असले, तरी या दृश्य परिणामांच्या मागे पडद्यामागचे जगही हा ग्रंथ आपणास दाखवतो म्हणजे असे की आता संवाद साधने माणसास ग्राहक बनवतात बातम्या वाचकाचे रूपांतर कंझ्युमर्समध्ये कसे करतात, नव्या व्यवस्थेत तूच तुझ्या यशाचा शिल्पकार धर्तीवर सेल्फ अँडिंग, अजेंडा सेटिंग, फिक्सिंग, जनमत संग्रहाचे गौडबंगालही समजवत असल्याने हा ग्रंथ केवळ जग दाखवणारा 'मॅजिक लॅटर्न' न होता, नव्या निद्रेतून जागा करणारा असा ‘आय ओपनर बनला आहे. क्राऊड सोर्सिंगमधून टेम्लेट कशी बनतात, याचा पर्दाफाश करणारा हा ग्रंथ 'लार्जर देंन साइज' बनणाच्या ससा होणा-या माणसास कासव बनण्याचा सल्ला जरी देत नसला, तरी भान नक्की देतो. परिकथेसदृश अशा नव्या आभासी जगाची ही अनुभूती एकाच वेळी तुम्हास आश्चर्यचकित करते नि अंतर्मुखही! आत्मकेंद्री होत असलेल्या माणसास अंतर संवेदी बनवण्याचे सामर्थ्य असलेला ग्रंथ या काळात तरंगणाच्या व तगू इच्छिणाच्या सर्वांनी अनिवार्यपणे वाचायला हवा असे मी आग्रहाने सांगेन, कोल्हापूर 'सकाळ' चे सहसंपादक संजय पाटोळे यांनी बांधलेली ही मोट म्हणजे नाटकामागचे नेपथ्य!


• संवादक्रांती - संपादक श्रीराम पवार (लेखसंग्रह)

 प्रकाशक - सकाळ पेपर्स प्रा. लि. ५९५,
 बुधवार पेठ, पुणे ४११ ००२
 प्रकाशन वर्ष - जानेवारी २०१७

 पृष्ठे १६0 किंमत -१६५/- रु.

♦♦

वेचलेली फुले/२११