पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘रिंगण'ची ठिणगी या घटनेत पाहता येईल. ती ठिणगी पुन्हा पेटली डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येने. अतुल पेठे व अजीम उर्फ राजू इनामदार लिखित 'रिंगणनाट्य' वाचताना 'रिंगण' या नाटक व गाण्यांनी आकाराला येणा-या, कार्यकर्ते, कलाकारांनी साकारलेल्या विचारगर्भ, कलात्मक, सर्जनशील नाट्यप्रकाराची प्रकृती कळते.

 अतुल पेठे व राजू इनामदारांना महाराष्ट्र ओळखतो, तो वैचारिक बांधिलकी असलेले रंगकर्मी म्हणून. या दोघांना मी 'सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम' च्या हिंदी अनुवाद, प्रयोग, तालीम नि प्रत्यक्ष खेळ अशा विविध प्रसंगी अनुभवलेले आहे. 'रिंगणनाट्य' च्या निमित्ताने त्यांना अभ्यासता आले. त्यांच्याबरोबर कार्यशाळेत सहभागी होता आले नि त्यातून माझी नाटकाविषयीची जाण प्रगल्भ होण्यास मदत झाली. हिंदीत डॉ. लक्ष्मीनारायण लाल, डॉ.शंकर शेष, मराठीत विजय तेंडुलकर, कन्नडमध्ये शिवराम कारंथ, बी.व्ही.कारंथ, या सारख्या रंगकर्मीचा अभ्यास, पैकी काहींच्या प्रत्यक्ष मुलाखती, सहवास, नाट्य समीक्षा लेखनात मला लक्षात आलेली जर कोणती एक गोष्ट असेल तर ती ही की ही सारी मंडळी नाटकाने नादावलेली मंडळी होत. त्याशिवाय तुम्हाला नवे प्रयोग, घाट सुचत नसतात.

 ‘रिंगण' हा तसा नवा नाट्यप्रकार. पथनाट्याचा हा रुंदावलेला परीघ म्हणूनही याकडे पाहता येईल. तरी ते पथनाट्यापेक्षा सर्वांगाने भिन्न होय. म्हणजे असे की, रिंगण मनोरंजनातून प्रबोधन करते. इथले कलाकार चळवळीतले कार्यकर्ते असतात. त्यांच्यात समूहद्भाव असतो. ते विचार बांधील असतात. तसे हे पण पथनाट्यासारखे ‘झिरो बजेट' नाटक, विचार हा नाटकाचा आत्मा. प्रेक्षकांवर काय बिंबवायचे ते निश्चित असते. संवाद छोटे, ते प्रेक्षक प्रतिसादी व प्रबोधकही असतात. ध्वनियंत्रणा, प्रकाश योजना, नेपथ्य, वेषभूषा असल्या पूर्वअटी नसतात. सादरीकरणात लवचिकता असते. रस्त्यावर पण नि सभागृहातही। ते सादर करता येते. प्रयोगानंतर प्रेक्षक संवाद असतो. कलाकार कार्यकर्ते असल्याने बांधील उत्तरे देतात. भाषा बोलाचालीची. प्रसंग अनुभव असतो. परिणाम सहमती असते. नाटकात गाणे, बजावणे, बतावणी सारे असते. प्रेक्षकांना खिळवून ठेवते. मला आठवते, दिल्लीच्या जागतिक पुस्तक मेळाव्यात ‘सुकरात से दाभोलकर वाया तुकाराम' हा रिंगणचा हिंदी प्रयोग असा रंगला की सारे प्रेक्षक तर जमलेच पण पुस्तक विक्रेतेही आपले स्टॉल सोडून नाटक पहात राहिले. (कारण त्या हॉलमध्ये 'रिंगण' मुळे एव्हाना अघोषित संचारबंदी लागू झालेली!) ही असते ‘रिंगण' ची ताकद. नंतर मी 'रिंगण' वर बोललो. भाषणही लोकांनी नाटकाच्या तन्मयतेने ऐकले. नंतर प्रश्न विचारले. ‘खूनी को क्यों नही

वेचलेली फुले/२०५