पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

औचित्य साधले आहे. राष्ट्रवीरांसह त्यांच्या पत्नीची-शांताबाईंची तसबीर देऊन या युगपुरुषाची सावली केवळ स्त्री दाक्षिण्य नसून तो सन्मान, गौरवही ठरतो. हा ग्रंथ संपादकद्वयांनी गुरुवर्यांचे प्रेरक पुरुष महात्मा फुले व छत्रपती शाहूंना अर्पून त्यांच्या प्रतीचे समाजऋण व्यक्त केले आहेत. प्रकाशक संस्थेचे कार्य प्रशंसापत्र आहे. त्याची नोंद आवर्जून आरंभी संस्थेचे महत्कार्य विशद केले आहे. ऋणनिर्देशात ग्रंथ सहाय्यक छोट्या मोठ्यांचे आभार मानून ही ग्रंथ सिद्धी म्हणजे सामुदायिक सहयोगाची निर्मिती असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ग्रंथास इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांची साक्षेपी प्रस्तावना स्मारक ग्रंथाचे अंगरंग स्पष्ट करते. तद्वतच ती स्मारक ग्रंथाचा उद्देशही स्पष्ट करते. यात शेवटी केलेला एका घटनेचा उल्लेख वाचकास शल्यकारक वाटतो तो अशासाठी की, गुरुवर्य शामराव देसाई यांचा जीवन व कार्यकाळ उलटून शंभर वर्षे झाली तरी गतवर्षी सीमा भागातील जत्रांवर शंभर कोटी रुपये खर्च होतात. महाभारतापासून आपणाकडे स्वकीय पराभव परंपरा आढळते. तिला अद्याप आपण ‘ढळ' द्यायला तयार नाही, याचे भान आणि जाणीव देणारा हा ग्रंथ सीमाभागातील बांधव वाचून कृती करतील तरच ती या स्मारक ग्रंथाची फलनिष्पत्ती ठरेल. ती ठरावी अशी मनोमन इच्छा व्यक्त करतो. 'राष्ट्रवीर'कारांच्या राष्ट्रीय समाजकार्यास विनम्र अभिवादन!


• ‘राष्ट्रवीरकार शामराव देसाई : जीवन आणि कार्य चरित्र

 संपादक : डॉ. जयसिंगराव पवार व प्राचार्य अनंतराव देसाई
 प्रकाशक - महाराष्ट्र इतिहास परिषद, कोल्हापूर
 प्रकाशन - २०१६

 किंमत - ५00 रु.

♦♦

वेचलेली फुले/२०३