पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शंकरराव देवांचे सान्निध्य लाभले. Economic theory of leisure class वाचून एस.एम. समाजवादी' झाले.

 एस.एम.नी २२ जुलै १९३१ रोजी हॉटसनवरील गोळीबाराचे केलेले वृत्तांकन 'फ्री प्रेस' मध्ये नावानिशी छापून आले नि रातोरात ते राष्ट्रीय पत्रकार बनले. पुढे राष्ट्रीय चळवळीबरोबर शेतकरी परिषदेचे कार्य सुरू झाले. नेताजी सुभाषचंद्रांचा एस.एम.ना सहवास लाभला नि त्याने स्फुरण चढले, ते जोमाने कार्य करू लागले. दरम्यान एस.एम एल.एल.बी. झाले होते. कायद्याचा चांगला अभ्यास होता. आता त्यांची भाषणे सभांना प्रभावित करू लागली होती. ते संघटक होतेच. आता वक्ते म्हणूनही त्यांना लोक बोलावू लागले. ४ जानेवारी १९३२ ला महात्मा गांधी, राजेंद्रप्रसाद यांना अटक झाली. पाठोपाठ काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड झाली. त्यात एस.एम. होते. त्यांना येरवड्याला ठेवण्यात आले. इथे महात्मा गांधींची भेट झालीआणि ते पूर्ण कार्यकर्ते बनले. नजरकैदेचे उल्लंघन केले म्हणून एस.एम.ना दोन वर्षांची शिक्षा झाली. तो दिवस होता ४ डिसेंबर १९३४. त्यानंतर स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातही एस.एम. जोशी अनेकदा तुरुंगात गेले. अटक सत्र हा त्यांच्या जीवनाचा भाग होऊन गेला. एस. एम. जोशी यांनी स्वातंत्र्यानंतर संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, कामगार संघटन, काँग्रेस समाजवादी पक्ष, बिहार आंदोलन, आणिबाणी विरुद्धचा लढा अशा अनेक चळवळींतून एस. एम. जोशी यांचे मूल्यनिष्ठ राजकारण तावून सुलाखून निघाले. ते इतकं हुकूमशाही कालखंडातही इंदिरा गांधींचे एस. एम. जोशी यांना अटक करण्याचे धाडस झाले नाही. ते राजरोस आणिबाणीविरूद्ध बोलत, भाषण देत फिरले. भारताच्या राजकीय प्रवासातील अनेक धुरीणांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले ते तत्त्वनिष्ठ राजकारणामुळेच. उदाहरणच द्यायचे झाले तर मधु लिमये, चंद्रशेखर यांचे ते राजकीय गुरू बनले. 'मी एस.एम.' आत्मचरित्र या साऱ्या राजकीय विकासाचा पट मांडणारी कथा होय. ती मुळातूनच वाचायला हवी. त्याशिवाय तिच्यातील प्रांजळपण लक्षात येणार नाही.

'स्व' विसर्जन'

 ‘मी-एस.एम.' आत्मचरित्र वाचत असताना एक गोष्ट लक्षात येते की, एस. एम. जोशींनी या ग्रंथात व्यष्टीच्या माध्यमातून समष्टीचे चित्रण केले आहे. अगदी बालपणापासून ते वानप्रस्थापर्यंतचा त्यांचा प्रवास वाचताना वाचक एक गोष्टींनी अचंबित होऊन जातो की माणसास एकदा समाजाचा,

वेचलेली फुले/१९0