या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
देणारा थरारक अनुभव. निसर्गाच्या प्रकोपाचे गुरुबाळ माळी यांनी केलेले निरीक्षण हुबेहूब शब्दबद्ध केलेय. मुसलमान हिंदूचे प्राण वाचवतो तेव्हा लक्षात येते भारत, पाकिस्तान ही आपण अहंकार, आंधळेपणाने उभारलेली कुंपण! ‘जय जगत' ‘सर्व भूमी गोपाल की' हेच खरे! हे केवळ प्रवास वर्णन नाही. तो वृत्तांत नाही. तो एका संवेदनक्षम पत्रकाराच्या आपदग्रस्त मन:स्थितीतून आकाराला आलेला एक सहज, संवेदी, मनुष्यलक्ष्यी एकात्म संवाद होय.
• काश्मिरी कयामत (अनुभवकथन)
लेखक - गुरूबाळा माळी
प्रकाशक - चिनार पब्लिशर्स, पुणे - ४३
प्रकाशन वर्ष - २0१५
वेचलेली फुले/१८४