पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केलीय व तिचा निर्णय, कौल वाचकांवर सोपवलाय. ही कथा मराठी वाचकास रत्नाकर मतकरींच्या खेकडा'ची आठवण करून देते.

 या संग्रहातील ‘बंद लिफ्ट' ही कथा लक्ष्मीकांत देशमुख यांनी पात्रांची नावे बदलून लिहिली असली तरी ती सरळ सरळ विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर यांची आहे हे सांगायला कोण्या भविष्यवेत्त्याची गरज उरत नाही. क्रिकेट हा अशाश्वततेचा शाप घेऊन जन्मलेला वैभवशाली खेळ होय. त्यातील यश तुमच्यात उन्माद, अहंकार जागवतो. तो तुम्ही किती संयमाने पचवता, यशही किती नम्रतेने स्वीकारता यावर तुमचं या खेळातले अधिराज्य अवलंबून असते. क्रिकेटमध्ये माणसेच असतात. ती याच समाजातने वास्तव, वृत्ती, विचार, विकार घेऊन वागत असतात. जात, धर्म, इथंही पाठलाग करत असतो. पण ख-या खेळाच्या यशापुढे ते सारे निष्प्रभ शून्य असते. हेही तितकंच खरे! ‘बंद लिफ्ट'चा प्रतीकात्मक प्रयोग करून लक्ष्मीकांत देशमुख यांनी हॅमच्या यशाचा अश्वमेध जातीपेक्षा उन्मादाने रोखल्याचं सूचित केलेय. ही लेखकाची दूरदृष्टीही व साहित्यिक भानही म्हणता येईल. सर्वाधिक कलात्मक क्रिकेट कथा म्हणून ‘जादूचा टी शर्ट कडे पहावे लागेल. ‘हिरो वर्शिप'च्या ध्यासातून जन्मलेला हा कथासंग्रह या कथेतून आपला हेतू वाचकांप्रत प्रभावीपणे नेतो. रोहित क्रिकेटियर असतो. त्याचा मुलगा मोहितलाही क्रिकेटचे वेड असतं. त्यांना दक्षिण आफ्रिकेत होणारी मॅच ‘याची देही याचि डोळा' पाहायची असते, पण आर्थिक ओढाताणीमुळे ते शक्य नसते. दुधाची तहान ताकावर म्हणत ती तो टी.व्ही. च्या छोट्या पडद्यावर पाहात असतो. पॅडी (हे बहुधा पतौडीचे संक्षिप्त रूप... तसे असेल तर मात्र कालक्रम विसंगत!) भारताचे नेतृत्व करत असतो... भारत जिंकतो... अँकर कपिल देवला प्रतिक्रियेसाठी आमंत्रित करतो... कपिलच्या मनात या मॅचमधील पॅडीचे एका क्रिकेट फॅनकडून प्लेकार्ड घेऊन केलेले अभिनंदन पाहून आपली एक जुनी आठवण ताजी होते. तो सांगतो... मी विश्व कप जिंकला तेव्हा असाच एक मुलगा, फॅन माझे अभिनंदन करता झाला होता... त्याला मी माझा टी शर्ट, ब्लेझर काढून दिला होता. तेव्हा तो असंच काहीसं म्हटला होता की... "Today you have won the World cup for India. In future we will too..." पॅडीने मग रहस्योद्घाटन केले... “तो फैन मीच होतो. अन् वाचक सदगदित होतात हे वेगळे सांगायला नको... ही असते लेखकाची किमया... लेखणी, भाषा शैलीची कमाल! अन् प्रतिभेतून साकारलेली अपरा सृष्टीही!!

 बॅडमिंटनवर आधारित दोन कथा ‘नंबर वन' मध्ये आहेत. ‘रिअल हिरो आणि शीर्षक कथा ‘नंबर वन्’ ‘दि रिअल हिरो' चा हिरो शांताराम. तसा तो

वेचलेली फुले/१५८