या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चीजा, जागा या आत्मकथेत भरलेल्या आहेत. त्याचे वाचन स्वतः करण्यात जो अनुभव येतो तो कबीरांच्या भाषेत सांगायचे झाले तर 'गुंगे का गुड' मुक्या माणसास गुळाची चव कळते पण सांगता येत नाही. जावे त्यांच्या वंशा' ची अनुभूती देणारा हा आठव... सांगावा तर पंचाईत... न सांगावा तर काळ सोकावेल याचं शल्य... अशी आत्मकथने मराठीत येतील तर मराठी आत्मकथा (विशेषतः स्त्री आत्मकथा) अधिक धीट होईल. म्हणून हा परिचय प्रपंच.
• मी अनिता राकेश सांगतेय...(आत्मकथन)
लेखिका - अनिता राकेश
अनुवादिका - रजनी भागवत.
प्रकाशक - मेहता पब्लिकेशन हाउस, पुणे
♦♦
वेचलेली फुले/१५१