न ठेवता लिहिले गेलेय. मराठीतील लेखकांच्या पत्नींनी यापूर्वी लिहिलेल्या ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय', 'नाच ग घुमा', अजुनि चालतेचि वाट' वगैरेपेक्षा हे कितीतरी थेट असल्याने ते शैलीच्या अंगाने मराठी स्त्री आत्मकथा साहित्यास बरंच काही देऊन जातं.
भारताच्या फाळणीचा काळ, विभाजित पाकिस्तानातून विस्थापित अनेक कुटुंबाबरोबर एक कुटुंब भारतात येते. शरणार्थी म्हणून दिल्लीतल्या सिव्हिल लाइन्समधील अँड हॉटेलमध्ये त्यांचे पुनर्वसन केले जाते... डॅडी व्यापारी. मम्मी लेखिका. दोघंही प्रयत्नशील पण यश सतत क्षितिजापारच. दोघांत भांडणे नित्याची. घरात साहित्यिक वातावरण, पंजाबी घर असल्याने परिवारावर मम्मीचा वरचष्मा. अनीता नि तिचा भाऊ आई-वडील असूनही अनाथपणाचे जीवन जगतात. कोणत्याही नशेत जगणाच्या आई-वडिलांची मुले भरल्या घरातही अनाथच असतात. फाळणी नि हे घर यांचे अद्वैत असते. फाळणी होते नि घर दुभंगते. दारिद्र्य येते. घरात आणखी एक मुलगी जन्मते नि फाळणी संपते. घरातली मोठी मुलगी अनिता वयात येते तशी लिहिती होते. लेखिका असलेल्या मम्मीस याचे अप्रूप नि कौतुकही। ‘सारिका' या प्रसिद्धी हिंदी पाक्षिकांचे (नंतर ते मासिक झालं) संपादक मोहन राकेश यांच्याशी पत्रमैत्री असते. अनिताच्या कथा ती संपादकांकडे पाठवते. मार्गदर्शक, दुरुस्ती व प्रकाशनार्थ, राकेशांचं पत्र येतं. “मीच घरी येऊन दुरुस्त करतो. ते घरी येतात. घरचेच होतात. नि दुरुस्तही! दुस-या पत्नीचा घटस्फोट होण्यापूर्वीच अनिताला पळवून नेऊन विवाह करतात. राकेश कलंदर. सतत मित्रांच्या गराड्यात. पूर्वा नि शैली अशी दोन अपत्यं अनिताच्या पदरात टाकून निवर्ततात.
मोहन राकेश हे हिंदीतले मोठे प्रस्थ. राजकारण, पत्रकारिता जगतात हकमत. राकेश गेले तरी ‘राकेश पत्नी' या ओळखीवर जीवन तगून जावं असा माहौल असला तरी, अनिता राकेश यांचे जगणे, जगलेले खरे खरे सांगणे यांत कुठेच खोट नसणे हे या कथा नजराण्याचे खरे वैभव.
ही आत्मकथा अनेकांगांनी आपला ठाव घेते. ती अनिताची कैफियत असल्याने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला पकडून ठेवते ती तिच्या करुण भोगामुळे. स्त्रीचे जगणे नव्या सुख शोधाचा कांचनमृग असतो. ती शिकार साधायला जाते नि स्वत:च शिकार होते. अनिताच्या वाट्यास जे येतं, ते कुणाच्याच वाट्यास येऊ नये...उपेक्षित बालपण, फसवलेले तारुण्य, अत्याचारित प्रौढपण व संघर्षशील उत्तरायण, एखाद्या स्त्रीच्या जीवनात येणारा प्रत्येक किरण तिरका नि तिरकसच का यावा? तिनेच म्हणून प्रत्येक वेळी का सहन