पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मी अनिता राकेश सांगतेय...' साहित्यिक स्त्रीची फरपट


हिंदी साहित्यात अवघी साडेतीन नाटके लिहन अजरामर झालेले नाटककार मोहन राकेश! त्यांनी कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, निबंध, दैनंदिनी, अनुवाद अशा सर्व साहित्य प्रकारांना स्पर्श केला असला, ‘सारिका' सारख्या पाक्षिक साहित्य पत्रिकेचे संपादन केले असले, तरी त्यांची खरी ओळख राहते ती हिंदीत रंगमंचीय नाट्यलेखन परंपरा सुरू करणारा नाटककार म्हणूनच, अनिता राकेश ही त्यांची तिसरी बायको. त्यांनी हिंदीत आपली आत्मकथा, आठवणी लिहिल्या. 'चंद सतरें और’ आणि ‘सतरें और सतरे सतर म्हणजे रेष. हे आत्मकथन आठवणींच्या उभ्या आडव्या रेषांचे वस्त्र आहे. त्यात क्रमबद्धता असली तरी मूळ पाया आठवणी सांगण्याचा. आपल्या एखाद्या जिवलगाशी मन हलके करण्यासाठी केलेले हितगुज असे या आत्मकथेचे स्वरूप असल्यानं ते हृदयस्पर्शी झालेय. हिंदीच्या कविमनाच्या प्राध्यापिका रजनी भागवत त्यांनी सदर आत्मकथेचा अनुवाद केला आहे. या पुस्तकावर ‘अमुक अमुक मूळ रचनेचा हिंदी अनुवाद' असा तर्जुमा छापला नसता तर हा अनुवाद आहे, यावर कुणी विश्वास ठेवला नसता इतका अस्खलित झालाय तो!

 शीला, पुष्पा, यांच्यानंतर अनिता राकेश यांच्या जीवनात आली, ती कथाकार म्हणून आणि त्यांची जीवननायिका बनली. राकेशांच्याच शब्दात सांगायचे तर ‘अनिताने त्यांचे रेकॉर्ड खराब केले. यापूर्वी दोन वर्षांपेक्षा जास्त ते कोणा बाई (?) बरोबर राह शकले नव्हते. सहा-सात वर्षं झाली, तरी या बाईचं घर सोडायचं काही लक्षण दिसेना...!' अनिताच्या जीवनातही अनेक पुरुष आले... ऐन धोक्याच्या वयातला पहिला प्रियकर, मग राकेश नि त्यांच्यानंतर कमलेश्वर, जतीनदार, पी.के. रम्मी आणि वेळोवेळी मनात आलेले अनेक! अनितामध्ये हा गुण बहधा अनुवंशाने आलेला... तिची आईही लेखिका होती... तिच्या भोवतीपण जैनेंद्रकुमार, अज्ञेय महावीर, अधिकारी यांसारख्या मान्यवर हिंदी साहित्यकार, संपादकांचा गराडा असायचा...! मी अनिता राकेश सांगतेय...' शीर्षकाने प्रकाशित सदर अनुवादित आत्मकथेत गढूळ, ‘काळेशार पाणी' असले तरी ते अत्यंत नितळ, पारदर्शीपणे कोणताही आडपडदा

वेचलेली फुले/१४८