Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपली कहाणी केवळ वाचनीयच केली नाही, तर ती चिंतनगर्भही केली आहे. आशाची ही आत्मकथा वाचताना मला माझ्या कॉलेजात पदवीधर झालेली फजिया आठवली. नवरा तिला रोज सोडायला नि न्यायला यायचा. घरातून ती बुरख्यात यायची. लेडिज रूममध्ये तो उतरवून चुडीदारमध्ये शिरायची. एन.सी.सी.ही तिनं केली. परत जाताना बुरखा घालून घरी जायची. एकदा मी फजियाला शेवटच्या वर्षात शिकताना विचारले, “यह चोरी चोरी शिक्षा कब तक?' फजिया म्हटली होती ‘अपना चाँद निकलने तक।' प्रा. आशा आपराद यांची ही आत्मकथा ही आत्मचंद्रांचे परंपरा क्षितिजावर उदयमान होणचं नाही कां ?


• भोगिले जे दुःख त्याला (आत्मकथन)

 लेखक - आशा आपराद
 प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
 प्रकाशन वर्ष - २00९

 पृष्ठे २७३ किंमत २२0 रुपये.

♦♦

वेचलेली फुले/१४७