पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सामाजिक कणव व्यक्त करणाच्या या ओळीच त्याच्या पुराव्याच्या रूपाने उदधृत करता येतील.

 खडकाच्या अंगी डोले पीक हिरवळीचे, नाते तुझे रयतेशी हृदय हळहळीचे!

 ‘शिल्पकार' काव्यसंग्रहात प्रत्येक राष्ट्रपुरुषाची रेखाटने देऊन कवीने हा काव्यसंग्रह सुबोध केला आहे. चरित्रांची निवड व्यापक असल्याने हा संग्रह राष्ट्रीय एकात्मतेचा वस्तुपाठ झाला आहे. जात धर्म-प्रांताच्या पलीकडे जाऊन कवी आपणास एका व्यापक नि उदार जगात घेऊन जातो.

 प्रा. भालचंद्र त्रिवेदी तसे गुजराती, पण मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व मराठी भाषिकास लाजविणारे वाटते. हे कौशल्य येते रियाजाने. यापूर्वी त्यांचे ‘दाह', 'तिमिर’, ‘मंदार', 'दीपदान' यांसारखे संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यानंतरचा हा पाचवा संग्रह अपेक्षापूर्ती करणारा ठरला आहे.


• शिल्पकार (चरित्र काव्य)

 लेखक - कवी भालचंद्र त्रिवेदी,
 प्रकाशिका - सौ. हर्षा त्रिवेदी, निपाणी

 पृष्ठे ५0  किंमत ३0 रुपये

♦♦

वेचलेली फुले/११९