‘शिल्पकार' : प्रेरक काव्यात्मक चरित्रसंग्रह
कवी प्रा. भालचंद्र त्रिवेदी यांचा शिल्पकार' हा काव्यसंग्रह म्हणजे राष्ट्रीय नेत्यांच्या काव्यात्मक चरित्रांचाच संग्रह होय. कवीच्या मनात आधुनिक काळातील संस्कारशील, आदर्श नेत्यांबद्दल आदर आहे. आपल्या मनातील आदर व्यक्त करण्याच्या हेतूने गुंफलेली ही काव्यांजली राष्ट्रीय काव्यमाला बनली आहे. तिचे राष्ट्रीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक महत्त्व आहे. या काव्यसंग्रहाचे संस्कारधन' म्हणून असलेले महत्त्व असाधारण आहे.
‘शिल्पकार'मधील चरित्र नायकांनी अनेकांच्या जीवनात काव्य फुलविले. पण त्यांच्या स्मृती समाधीवर कोणी काव्यफुले वाहिली असावीत का? असा शोध घेता लक्षात येते की, यातील गोपाळ गणेश आगरकर, डॉ. पंजाबराव देशमुख, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, प्रबोधनकार ठाकरे, बाबा आमटे, शेरपा तेनसिंग, सर विश्वेश्वरय्या यांसारख्या राष्ट्र पुरुषांवर 'शिल्पकार' मध्ये पहिल्यांदाच काव्यांजली अर्पित केली जात आहे.
हा काव्यसंग्रह प्रारंभापासूनच आकर्षक, त्याचे मुखपृष्ठ तिरंगी ठेवून कवीने प्रथमदर्शनी त्यास राष्ट्रीय परिमाण बहाल केले आहे. अनुक्रमणिकेत राष्ट्रपुरुषांच्या जन्म व मृत्यूच्या नोंदीने ते शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त झाले आहे. संग्रहात लाभलेल्या प्रा. ग. प्र. प्रधानांच्या प्रस्तावनेमुळे पुस्तकाचे प्रशस्ती बळ तुळशीपत्राने नाही, तर भूर्जपत्रावत ऐतिहासिक झाले आहे. पुस्तकाचा आकार छोटा ठेवून हा काव्यसंग्रह छोट्या दोस्तांसाठी असल्याचे आपसूकच स्पष्ट होते.
अशा अनेकविध वैशिष्ट्यांनी विनटलेल्या शिल्पकार'चे आंतरिक सौंदर्यही तितकेच मोलाचे. चरित्र नायकाची गुणवैशिष्ट्ये प्रा. भालचंद्र त्रिवेदींनी समर्पक शब्दात व्यक्त केली आहे. 'वक्तृत्वात पाझरे शाश्वततेचे सार' यासारख्या ओळीतून ते स्पष्ट होते. कवीस सामाजिकतेचे मोठे भान असल्याने राष्ट्रपुरुष निवडताना त्यांनी समाजकार्याची लावलेली कसोटी व सांगता लक्षात येते. ती काव्यातून मात्र प्रकर्षाने जाणवते. कर्मवीर भाऊराव पाटील यांची सारी