‘ठरलं...डोळस व्हायचंच' : अंधश्रद्धा निर्मूलनाचे समुपदेशन
ठरलं... डोळस व्हायचंच!' हे पुस्तक शीर्षकापासूनच तुम्हाला दृढसंकल्पी बनवते. मुखपृष्ठावरील निळे डोळे आणखी काही नसून बंद झापडे उघडणारी कवाडे होत. मुखपृष्ठकार चंद्रशेखर कुलकर्णीनी मोठ्या कल्पकतेने पुस्तकाचा सारा आशय प्रथमदर्शनीच लक्षवेधी बनवलाय. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे तडफदार कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सदर ग्रंथातून तरुण मित्रमैत्रिणींना घातेलेली साद, त्यांच्याशी केलेला संवाद एक विधायक असे सामाजिक समुपदेशन होय.
एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर तरुण-तरुणींच्या मनात श्रद्धा, अंधश्रद्धा, अश्रद्धा, यांचे जे काहूर द्वंद्व आहे ते प्रश्न तुमचा उत्तर आमचे' अशा पद्धतीने दूर करून आपले जीवन वैज्ञानिक समृद्धीनी सुखकर बनले. भारतासारख्या देशात ‘विज्ञानसृष्टी' साकारली तरी इथे ‘विज्ञानदृष्टी' आकारली असे म्हणणे विसंगत ठरावे. आपली तरुणाई परंपरा नि नवतेच्या सीमेवर असताना त्यांच्या शंकांना नेमके वस्तुनिष्ठ, वैज्ञानिक उत्तर देणे पूर्वसुरींचे कर्तव्य ठरते. डॉ. दाभोलकरांनी कर्तव्यपूर्तीच्या भावनेतून केलेले हे मार्गदर्शन म्हणूनच महत्त्वाचे ठरते.
घुबडाचे तोंड पाहणे अशुभ असते का? अंगात येते हे खरे का? संमोहन विद्या आहे का? फटाके उडवणे अपायकारक का? सहावे पंचेंद्रिय असते का? ज्योतिषशास्त्र हे शास्त्र की भाकीत? नशीब हा काय प्रकार आहे? सत्यनारायणाची पूजा सत्य की असत्य? होळी का करू नये? अंधश्रद्धा निर्मूलन व धर्म-अधर्म संबंध काय? वास्तुशास्त्रातील नव्या भंपकपणाला काय आधार? हे नि असे अनेक प्रश्न म्हणजे सध्याच्या विज्ञानसन्मुख होऊ पाहणाच्या तरुणांपुढील जगण्याचे यक्षप्रश्न होत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे पत्र, संवाद, समुपदेशन, अध्यापन अशा अनेक शैलींनी या पुस्तकात दिली आहेत. ज्यांना ज्यांना म्हणून आपल्या मनातील परंपरा, चाली, रूढी, भ्रम, समजुती, यातून सुटका करून घेऊन माणसाच्या प्रत्येक कृती व कर्तव्यास वैज्ञानिक अधिष्ठान द्यावे, असावे वाटते त्यांनी हे