पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/110

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘मयूरपंख'लाही कवयित्रीच्या रेखाटनाचे लेणे लाभले आहे. मराठी कवितेचा हिंदी अनुवाद होणे ही आनंद व स्वागताची गोष्ट खरी; पण मराठी हिंदी वाचकांच्या अंगणात मोरनाच करणार, तर हिंदी अंगणातल्या मोरनाचांचे पदताल, स्वर, रागदारी यांचे पूर्वभान असायला हवे. अनुवादक अजीम हिंदी मातृभाषी असल्याने त्यांनी हे शिवधनुष्य ब-यापैकी पेलले आहे. काही ठिकाणी मराठी प्रभावात ते अडकतात. त्यामुळे ‘मखमल', ‘कील', 'चाव' असे प्रतिशब्द येतात. त्याऐवजी मलमल’, ‘शूल', 'प्यार' येते तर अनुवाद अनुप्रासिक सौंदर्याबरोबरच भावसुंदर झाले असते.


• मयूरपंख शैला सायनाकर (काव्यसंग्रह)

 अनुवाद - अजीम
 प्रकाशन - राजकिरण प्रकाशन, इस्लामपूर

 पृष्ठे -१३०  किंमत - ८0 रुपये

♦♦

वेचलेली फुले/१०९