निरीक्षण, नि:शब्द सामर्थ्याची कल्पना यावी. 'बंजा-याचे घर' पुस्तक म्हणजे चित्रशैलीचा सुंदर नमुना. या पुस्तकाचे सारे सौंदर्य शैलीत सामावलंय.
पत्ता हरवलेल्या घराआधीचे ‘१२ ए- रेशम' हे घर महानगरातील फ्लॅट संस्कृतीचे व्यवच्छेदक रूप. पैसा, प्रतिष्ठा सर्वत्र असलेल्या महानगरात मुख्यमंत्री मोठा की बिल्डर ? मुख्यमंत्री कोट्यातील घर मिळवण्याचे दिव्य पार केल्यानंतर मिळालेले हे घर लेखिकेला आपली जागा, आपले जग मिळवून देते.
या पुस्तकातील प्रत्येक लेखास लाभलेली सूचक, समर्थक शीर्षक या पुस्तकाचे आगळे वैशिष्ट्य. या प्रत्येक कथात्मक लेखाच्या सुरवातीस व शेवटी मनोज आचार्य यांची रेखाटने पुस्तकास बोलकी करतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठात हिरवे, निळे, पिवळे जर्द रंग ओतून निसर्गाचे गहिरेपण चित्रकारांनी असे चित्रित केलेय की, त्या घरांची ओढ वाचकांना दाटून आल्याशिवाय राहत नाही.
‘बंजाऱ्याचं घर' मधील पत्ता हरवलेले घर, ही एक स्वतंत्र कथा आहे. कथेची विषयक पार्श्वभूमी घर असली तरी दोन पुरुषांमधील वैश्विक संबंधाची ही कथा. एक गंभीर विषय पेलणारी कहाणी. कथात्मक ललित लेखांबरोबर देणे औचित्यपूर्ण खचितच नाही. लेखिकेने संग्रहभर कथा होईपर्यंत या कथेसाठी थांबायला हवे होते. हे पुस्तक सदरचा अपवाद वगळता समाज व व्यक्तीसंबंधीची ललित अंगांनी केलेली मांडणी असली, तरी त्यामागची सल सतत वाचकास अस्वस्थ करत राहते.
लेखिका - यशोधना भोसले
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे