बंजाच्याचे घर' : बदलत्या घरांची ललित कथा
‘घर' या विषयाभोवती घुटमळणाऱ्या ललित लेखांचे पुस्तक आहे, ‘बंजा-याचे घर'. यशोधरा भोसलेंनी ते लिहिले आहे. पुस्तकात 'घर' विषयाची एक कथाही आहे. शेवटी 'कुणी घर देता का घर?' असा टाहो फोडणाच्या नटसम्राटांची आंतरिक घालमेल घेऊन येणारे हे पुस्तक 'घर' या विषयाशी जोडलेल्या स्त्री मनाचा गुंताही उकलते. व्हर्जिनिया वुल्फनी ‘ए रुम ऑफ वन्स ओन'ची कल्पना मांडली होती. पंजाबी कवयित्री अमृता प्रीतमनी तीच कल्पना ‘चौथा कमरा' म्हणून स्पष्ट केली आहे. शांताबाई शेळकेंनी 'चोली का अपना दामन म्हणून समाजाच्या आसमंतातील स्त्री मनाचा अवकाश वर्णिला होता. यशोधरा भोसले आजोळ, माहेर, सासर, मित्र अशी घरांची स्थित्यंतरे अनुभवतात. जीवनात कोसळलेले आकाश पेलत यशोधरा भोसले आपले आकाश, अंगण, आसमंत निर्माण करतात. जीवनातल्या प्रतिकूल क्षणी आपली असणारी माणसे जेव्हा दुरावतात तेव्हा दगडमातीची निर्जीव वाटणारी घरेच ऊब देतात. कधी काळी स्वतः बंजारा असलेला मुख्यमंत्री यशोधरा भोसलेंसारख्या निराधार परागंदा स्त्रीस मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून घर देतो तेव्हा ती आई-बाबांची पुण्याई म्हणूनच; पण या साऱ्या प्रवासात लेखिकेस सावरतात ती घरेच तेच तिचे खरे गणगोत.
‘बंजाच्याचे घर' जीवनाच्या अवघड वळणावर स्त्रीस बळ देणाऱ्या घराच्या घरंदाजपणाची स्वागतच होतं! घर बोलतेय की लेखिका असा कधी कधी भ्रम पडावा, अशा एकात्मिक लालित्याने लिहिलेले घरासंबंधी ललित लेख वाचताना वाचकाला स्वत:चे घरदेखील मनी-मानसी बोलू, डोलू लागल्याचा अपसूक भास होऊ लागतो. हे असते यशोधरा भोसले यांच्या ललित नि संवेदी शैलीचे यश. पुस्तक वाचताना लेखिका कधी काळी उभारीच्या वयात इंग्रजीमय झाली होती, हे खरे नाही वाटत. साऱ्या घरांच्या वर्णनामागे एक अंधूक, अलिखित सूत्र जाणवते. जागतिकीकरणाच्या कचाट्यात सापडलेल्या घराने मनुष्यपण मारले. हवा, पाणी, परिसर विद्रुप, विरूप होऊ लागलेला आहे. अशा स्थितीत घराचे घरपण आपण जपले जोपासलं तरच सुख समृद्धी स्वास्थ्य