Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९२ ) घडक दिली की, त्यासरशी तो आरसा फुटून त्याचे शतावाधे तुकडे खळाळू आवाजाने खाली पडले. याचसंवीस कृष्णा डोकविर पाण्याचा हांडा घेऊन आली आणि तो आवाज ऐकून व हांडा टाकून तशीच घावया घावया खोलीकडे पळत गेली. आणि पहाते तो आरशाचा चुराडा उडालेला तिच्या दृष्टीस पडला. तिनें संतापानें हात आपटले; बोटे मोडलीं, परंतु अशा करणीने आरसा कांहीं नीट झाला नाहीं ! यजमानीन घरी परत आल्यावर तिने हा सर्व प्र. कार पाहिला व त्या गाऊल मोरकरणीस कामावरून हांकलून दिले. हुकुम अमान्य करून शिवाय नुकसानीस कारण झाल्यामुळे तिने तिचा पगारही दिला नाही. यापुढे ती ज्याच्या घरी राहिली तेथे तिला दारे बंद करण्यास सांगण्याचें कोणास कारण न पडतां उलट ते तिला उद्देशन ह्मणत " शिक्षणाचे महत्व प्रसंगा- शिवाय कळत नाहीं ते असे, "