Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९१ )

जात आहे; मार्गे सर्व दारें, मुख्यत्वेकरून रस्त्याव- रील दार बंद ठेवण्याची काळजी अमूं दे. मी तुला पूर्वी शंभर वेळां सांगितले असेल, पण स्मरण करें तें राहतच नाहीं ! बरें, या वेळीं तरी चांगले लक्ष ठेव. तूं विस्मरणाने दारें मोकळी टाकलींस तर कोणी तरी भामच्या घरांत शिरून कांहीं तरी चोरून नेईल. "
 असे सांगून अहिल्याबाई चालती झाली. नंतर काही वेळाने कृष्णा मोलकरीण हौदावर पाणी आणण्या- साठी गेली. जातांना तिने आपल्या नेहमींच्या वहि- बाटीप्रमाणे सर्व दारे उघडींच टाकली; आणि ह्म- णाली, " अंः, मला तर रस्त्यांत या टोकापासून त्या टोंकापर्यंत कोणी असल्याचे दिसत नाहीं. " असे म्हणून ती आपल्या घनिनीच्या मित्र्या स्वभावाबद्दल हंसूं लागली. परंतु कृष्णा, हौदावर आपल्या सोबती- णीशी गोष्टी बोलत हंसत खिदळत असतां, इकडे रस्त्यावरून एक बोकड चालला होता. तो घरांत शिर- ला; व पायऱ्या चढून त्या बाईच्या खोलीत गेला.
 खोलीत पुष्कळ मौल्यवान् सामान भरले होतें, त्यांत एक सुंदर मोठा आरसा असून तो अगदी जमिनीशी टकेला होता.त्यांत दुसरा एक वोकड आहे असे या बोकडारा वाटले, आणि आपल्या शिंगांची त्यास टक्कर देण्याची तो तयारी करूं लागला. अर्थात् आ रशांतील बकऱ्याचीही सर्व याच्या सारखीच शिद्धता झाली. इतक्यांत त्या सजीव बकऱ्याने आपल्या प्रति- मेवर झांप टाकून त्या आरशास शिंगाची अशी जोरानें