प्याची तुला शरम वाटत नाहीं, तेथें गहूं, हरभरा,
ज्वारी, मका वगैरे रूक्ष धान्यासाठी देखील तूं हात
पसरतेस, इतकेच नाही, तर कधीं कधी उघड्यावर
इकडे तिकडे पडलेल्या दाण्यांवरही घसरून त्यांस
पटापटा तोंडांत उचलून टाकीत असल्याचें दृष्टोत्प
तीत येतें; तसेच जेथें माशा, घुंगुरडी वगैरे घोंगावून
जणं काय आपल्या आदरसत्कारार्थच त्यांनी बाहिलें
आहे असे मानून तूं त्या उकिर्डा वगैरे ठिकाणी मो.
ठ्या प्रेमानें उष्टयामाष्ट्याचा स्वाहाकार चालवितेस.
मग असे असून, हे क्षुवे ! ज्या आह्मा थोरामोठ्यांच्या
घरी उत्तमः उत्तम षड्स पकानें घमघमीत सुवासाची व
लोणकढ्या. साजूक तुपानें: भाच्छादलेली तुजकरितां
सिद्ध असतां, संगीताच्या मधुरध्वनींत आपली तृप्ति
करून घेण्यास येण्याचे इतके तुझ्या जीवावर कां बरें..
येतें ? क्षुवे ! तुझ्या बुद्धीला इतकें मांद्य कशानें आलें ?
फाटक्या तुटक्या पत्रावळींवरील नासकें, कुसकें, कच्चें,
शिळे, रूक्ष, वगैरे अन्न खाणे, आणि सुवर्ण ताटांतील
सुंदर, मधुर, परिपक्क, ताजें वगैरे पंचामृतभोजन करणे.
यांतील भेद तुला काहीच कळत नाहीं काय ? राना-
डोंगरांत हंडा वैदू वगैरेंच्या पोरांसदेखील तूं
वश असतेस. उन्हातान्हांत हिंडून, वाईटसाईट दे-
खोल पाणी मिळतें न मिळते अशा स्थितीत तो कुसकें
नासकेंही अन्न खुशास खात असतो, या त्याच्या कृ
त्याचा वास्तविक मृत्यूलाही राग यावा ! परंतु तो
मुलगा तुझ्या आश्रयाचें सुख अनुभवीत असतो. मग
अशा भीतीच्या ठिकाणी जर तूं आपले पुष्टिमुख व्या
पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/९२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८८ )