Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८७)

जावरील खलाशाच्या पोरालादेखील तूं वश असतेस. उंच व ज्या ठिकाणाहून खालीं बघितले असतां घेरी येते, अशा ठिकाणी तो निजलेला असतो- तुफाना- च्यायोगानें समुद्र फार खवळून प्रचंड लाटांच्या योगाने ते जहाज खाली वर होत असतें-वायचा सोसाटा एकसारखा चालू असतो-आकाशांत ढगे येऊन वि जांचा चकूचकाट व गडगडाट इतक्या मोठ्याने चाल- लेला असतो, की त्यानें प्रत्यक्ष मृत्युदेखील जागा होईल; पण अशा ठिकाण तो मुलगा खुशाल तुझ्या समागमाचें सुख अनुभवीत असतो. मग अशा गडबडी च्या ठिकाणी जर तूं आपले विश्रांतिसुख त्या खला- शाच्या पोराला मिळं देतेस; तर हे पक्षपाती निद्रे ! मी तर राजा, माझ्या येथें सर्व कांही अनुकूल, मग मलाच तें सुख कांबरे नसावें ? "


चाले सुधार्त प्राण्या, असले अन्न कसें जरी वोखटें ।

तद्भावबांच्छाची, स्पर्शा न होय असे परी चोखटें
क्षुधा.

 एक राजा क्षुस उद्देशून आपल्याशीच ह्मणतो:- हे क्षुब्व क्षुधे ! विधात्यानें यावतजीबांच्या उदर- भरणासाठी तुला घात्री बनविले आहे. मग हे उपमाते ! माझे जठर संतृप्त करून माझ्या शारीर- व्यायामास तूं उत्तेजन कां देत नाहींस ? माझ्याजवळ येण्यास तुला भीति वाटते की काय ? प्रखर उन्हांत तावत असलेल्या शेतकऱ्याच्या माळ्याकडे भांव ठोक-