Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सज्जनकूं सज्जन मिले, घडे ग्यानको बात;
दुर्जनकूं दुर्जन मिले, दो बुको दो लात.
8 शहाणा आणि मूर्ख.

 एक मूर्ख मनुष्य एका शहाण्या मनुष्याच्या गळ्यांत हात घालून त्यास ओढीत आहे, असे एका विचारी पुरुषाने पाहिले. तेव्हां तो ह्मणाला," हा मनुष्य जर खराच शहाणा असता, तर असा प्रकार घडून आलाच नसता.कारण, दोघां शहाण्या पुरुषांचें कर्वीही भांडण व्हावयाचें नाहीं; आणि खरा शहाणा आहे तो मूर्खाच्या तोंडी लागणार नाहीं. जरी एकादा दांडगा मनुष्य त्याला कांही वेडेवांकडे बोलला,तरी तो त्याला फार नम्रपणाने उत्तर देईल. दोघां शहा- च्या माणसांमध्ये कधी कोणाच्या कैंसास देखील धक्क लागणार नाहीं. तसेच, एक हट्टी आणि दुसरा सा- लिक असला ह्मणजे त्यांच्यामध्ये कांहीं गडवड व्हा- वयाची नाहीं; पण दोघां मूखाँची गांठ पडली ह्मणजे मग मोठाले साखळदंड देखील तुटतील ! "

नशिबानें कधींच मदत येत नाहीं जाण,
तर तो ईश्वर पाठवितो हेच प्रमाण.
मेघगर्जना.

 परशुराम नांवाचा एक लहान मुलगा, शहराबाहेर