होऊन, आपल्या वाडवडिलांनी सर्वोत्कृष्ट विचाराने
स्थापन केलेल्या रीतिभातींचा उपयुक्तपणा कबूल
करूं लागतात.
आळवणी आले आणि तळवणी घेऊन गेलें.
एक तांबट आपल्या गिन्हाइकांची कल्हईस नेलेली भांडी परत करी तेव्हां त्यांजबराबर कांही बारीकसा- रोक बोळकुली त्यांत घालून देत असे; हीं बोळकुलीं कोठलीं? असें विचारतां, तुमच्या मोठ्या भांड्यांपैकी काही व्याल हणून तो उत्तर करीत असे. हे उत्तर ऐकून कोणी कोणीं तीं बोळकी परत नेण्यास सांगत, कोणी लोमानें ठेवूनही घेत ! असा क्रम कांही दिवस चालवून त्या लबाड तांबटानें वहा पांच रुपये पदरमोड केली, नंतर एके दिवशी त्याने शेपन्नास रुपयांच्या भांड्यांस खांड्यांत घातलें. जे कोणी लोभाने वोळकी ठेवून घेत असत त्यांची ती भांडी मेली म्हणून त्याने सांगितलें. " मांडी कोठें मरत असतात? " असा कांहींनी प्रश्न केला. कित्येक आपला मूर्खपणा कबूल करून स्वस्थ बसले. ज्यांनीं 'भांडी कोठें मरतात का? ' म्ह- णून प्रश्न केला त्यांस त्या पूर्त तांबटाने असा जबाब दिला की, “ ज्यांची भांडी वितात, त्यांचीं मरतात, ज्यां ची वीत नाहीत त्यांची मरतही नाहीत.