Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७९)

घांटेला काय किंमत पडली असेल बरें ? "व्यंकोजी म्हणाला, " पांच रुपये. " •वाटसरू मनुष्य म्हणाला, काय ? अवघी पांचच रुपये ? मी तुम्हाला संतोषानें दहा रुपये देत. " व्यंकोजीने गाईच्या गळ्यांतील घांट सोडून त्या मनुष्यास दिली, आणि त्याजपासून १० रुपये घेऊन ते हर्षाने आपल्या खिशांत टाकले.
 परंतु गाईच्या गळ्यांतील घांट नाहीशी होऊन, तिच्या आवाजाने तो गाय कोणीकडे गेली आली याचे ज्ञान त्या व्यंकोजीस होत असे ते होईनासे झाले. एका दिवशीं तो गाय चरतां चरतों कळपावाहेर गेली; तो वाटसरू मनुष्यं चोरच होता, तो लपून छपून तिच्या पा ळतीवर होताच, त्यानें संधि साधून ती गाय लांबविली.

दुराचरणास वश झालां की तुमचा चांगुलपणा गेला.

भाग २ रा.

 व्यंकोजोनें रडून आपले डोळे सुजावले, तो घरी जाऊन आपले दुर्दैव सांगू लागला,त्याच्या डोळ्याच पाणी कसें तें खळेना ! तो उसासा घेऊन ह्मणाला, त्या लबाड मनुष्यानें गाय लांबविण्यासाठींच त्या घांटेचे १० रुपये माझ्या हातावर ठेवण्याचें औदार्य दाखविलें, अशी त्या वेळीं माझ्या मनांत कल्पना तरी आली काय ? "
 त्याचा वाप म्हणाला,"व्यंकोजी रडूं नको. चो- राने जसें तुला फलविले, त्याप्रमाणेच आह्मां सर्वांस मोहांत घालण्याचें मार्ग पाप शोधीत आहे. पाप है प्रथम क्षणिक हंगामी फायद्याकडे आपले मन वळवित,