Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७८)

 ५ व्यानें फुंकून नारळ फोडण्याच्या व सहाव्याने पा- टोसकट मिठाई खाण्याचे पैजेची गोष्ट सांगितली. नंतर एक शहाणा मुलंगा म्हणाला, “एखादा शहाणा मनुष्यं अस ता, तर त्यानें या गोष्टी मुलांपेक्षा अधिक बनावट करू सांगितल्या असत्या, पण त्यांत अर्थ काय ? भाकडे गोष्टी किंवा एरंडाचे गुन्हाळ हाच की नाहीं.? तासभर गुन्हाळ वाजलें हीच मौज ! - भाकड म्हणजे दूध न देणारी, आणि एरंडाचें गुन्हाळ ह्मणजे रस- रहित; तद्वतच या गोष्टी साररहित-अर्थात् निरुप योगी गणल्या जातात."


फाजील किमतीनें वस्तु मार्गे कोणी कोणा,

तो फसविण्याचा प्रयत्न हें मनीं आणा.

५४ गाईच्या गळ्यांतील घांट.

 व्यंकोजी नांवाच्या एका उमेदवार शेतकऱ्याने, रा नांत कांही गाई बाळगल्या होत्या. त्याने प्रत्येक गां- ईच्या गळ्यांत एकेक घांट बांधली होती; परंतु जसज- शा एकापेक्षा एक अधिक देखण्या व दुभत्या गाई होत्या त्या मानानेच त्यांच्या गळांतील घांटाही सुंदर- पणांत एकाहून एक वरचढ व मोल्या होत्या. अर्थात् सर्वात अतिसुंदर गाईच्या गळ्यांतील घंटा आ सुरेखच असली पाहिजे! कोणी एक मनुष्य त्या रानां- तून चालला होता, तो, व्यंकोजी म्हणाला, " पाटील बुवा, ही गाय किती सुंदर व देखणी आहे ! तशीच तिच्या गळ्यांतील वांटही पण सुरेख आहे ! या