Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४)
ईश्वर पाठवितो ऊन, पाऊस आणि तुफान,
आनंद आणि दु:खें, आपल्या फायद्याकरितां जाण
३. ऊन आणि पाऊस..

 अंधारी पडली आहे, वावटळी हवा बनली आहे, पर्जन्य तर काय, मी ह्मणून तयारच आहे ! अशा पावसाळ्यांतील एका दिवशीं कांही मुले ह्मणाली:- " नेहमीं सूर्य प्रकाशीत असून कडक ऊन पडावे असे आम्ही इच्छितों. " त्यांची ही इच्छा लौकरच तृप्त झाली असें दिसतें. कारण, पुढे कित्येक महिने, आका- शांत ढग आलेला त्यांच्या दृष्टीस पडलाच नाही. परंतु या बऱ्याच दिवसांच्या अनावृष्टीने शेतें आणि कुरणे यांची अत्यंत नासाडी झाली. बागांत फुले, पानें, माजीपाला, वनस्पति वगैरे अगदीं कर्पून गेली, आणि वायकांस ज्या दुर्वांच्या लाखोलींची परम आवड, त्या एक गहूंभर देखील वाढल्या नाहीत.
 आई म्हणाली: " पहा आतां, उन्हाप्रमाणे पाव- साची देखील गरज आहे की नाहीं ती ! यावरून. तुझी, ईश्वरानें केलेली शहाणपणाची व्यवस्था लक्षांत आणा, आणि सत्य काय तें जाणा. आपणा मर्त्य मनुष्यांच्या सुखार्थ नेहमीं प्रकाशीत आणि आनंदपूरीत दिवस असणेंच फायदेशीर आहे असे नाहीं; अंधारे व पावसापाण्याचेही दिवस असले पाहिजेत, आणि दुःख क्लेश हींही आपणावर वरचेवर आलींच पाहिजेत, त्यांशिवाय अनुभवज्ञानाची प्राप्ति नाही. "