Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७५ )

ईश्वर गरजवंताला साहाय देतो,

उद्योगी आणि काटकसरी जाणतो.

५२ गाय.

 बया नांवाची एक विधवा, आपल्या दोघी कन्यांसह अति भुकेबंगाल किंवा कंगाल स्थितीत राहिली होती. त्या मोलमजुरी करून जे काय मिळवीत तें त्यांच्या पोटापाण्याकडे खर्चून नाई; वस्त्रप्रावणीची ददात आहे ती आहेच ! यांनी एक गाय बाळगली होती, तिला त्या उष्टेखरकटें गोळा करून चारीत असत. तो गाय एका दिवशीं मेली, हा त्यांस जबरच धक्का बसला ह्मणावयाचा.
 त्या शोकाकुल होऊन ह्मणाल्या, "अहाहा ! ईश्वर आम्हांस एकादी गाय देईल काय ? आतां आमच्यानें गाय खरेदी करण्यापुरता पैसा जमविला आणार नाही."
 शेजारी म्हणाला, " तुमच्याने करवेल तितकें करा, ईश्वर त्यांतच तुझांस मदत पाठवील.
 वया म्हणाली, " तर मग आह्नीं काय करावें ? "
 शेजारी म्हणाला,'तुझांस हल्लीपेक्षा जास्त परि- श्रमाचें काम करून प्रथम आपली किफायत वाढविली पाहिजे. तुझी मायलेको सर्व, कशीदा व शिवणकामांत, हुशार आहां. दररोज एक दोन तास जास्त काम करा लणजे झाले ! तुझी मिळवितां त्याहून जास्त न मिळवाल तर तुमचें पुरतेंच दुर्दैव ओढवले ह्मणावयाचें ! दुसरें, गृहाणपणानें काटकसर करून तुम्हास आपला ७ खर्च कमी केला पाहिजे. तुझी दररोज दुवक्ता घोडा मात व पांढरी पोळी करून वरणही शिजवीत असतां,