Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७२)

झा वेत फसला, हा मात्र हरकत करील. कारण ज्यापासून सुटका झाली त्या फाशाकडे तो टिटवी . पक्षी पुन्हा कध येणार नाहीं. "
 कुशी ह्मणाली, " असे असेल तर, तुझपाहून तो टिटवी पक्षो अधिक शहाणा असे आपणास कबूल केले पाहिजे; कारण, ज्या संकटांतून त्याची सुटका झाली त्या संकटांत तो होऊन कधीं पडणार नाहीं, आणि ज्या तुला नुक्तीच जखम होऊन तुझ्या दुर्दैवाचा फेरा चुकला तो तूं पुन्हा तशा संकटांत पडण्याची इच्छा करतोस हे वेडेपण होय ! "


चोर अपराध लपविण्याचा यत्न करील तर करो

तो उघडकीस येण्याचा संभव आहे असे स्मरो.

५० राहू.

 मारुतीराव नांवाच्या वृद्ध पारध्याच्या खोलीत एक राव होता, त्यास त्यानें लहानपणापासून वाढविलें होतें. तो थोडेसे बोलतही असे. उदाहरणार्थ, जेव्हां त्याचा धनी त्यास म्हणे कीं, "पोपटजी, तूं कोठे आहेस ?" तेव्हां तो पक्षी चांगला शिकविला गेला असल्या कार- णानें "मी येथे आहे. " असे उत्तर देण्यात कधीं चुकत नसे.
 मारुतीरावाच्या शेजाऱ्याचा काशीनाथ नांवाचा एक लहान मुलगा होता, त्याला हा राघू पाहून व त्या- चे बोलणे ऐकून विशेष समाधान वाटत असे; या-