Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७१ )

करणाच्या चांगुलपणाचा मोबदला द्यावा अशी ईश्वरी. च्छा आहे. "



सूचनेकडे दुर्लक्ष्य करतो, तो नाश पावतो.
४९ टिटवी (पक्षी).

 लक्ष्मण नांवाचा मुलगा आपल्या बहिणीस हाणाल त्या सीताफळीच्या फांद्यांत उंचावर तो सुंदर टि- टवी पक्षी बसला आहे, तो पहा; थांब, तो लौकरच माझा होईल. " अर्से ह्मणून लक्ष्मण झाडावर चढला, आणि त्या पक्ष्यास धरण्यासाठी त्याने तेथे जाळे पसर- चें; नंतर खाली उतरून, बहिणीसह एका झुडपाआड रुपला व पक्षी जाळ्यांत केव्हां सांपडतो याची वाट पाहूं लागला.
 कांही वेळानें तो पक्षी जाळ्यांत अडकला, आणि त्यास घरण्यासाठी लक्ष्मणाने झाडावर चढण्याची त्वरा केली; परंतु पक्ष्यास जाळ्याबाहेर काढतांना लक्ष्मण खाली पडला. पक्षी सुटून गेलाच, परंतु मोडक्या खांदीस घसरटून लक्ष्मणाचा हात अगदी रक्तबंबाळ झाला. तें पाहून कुशी म्हणाली " भाऊ ! पक्षी धरण्या- करितां ह्मणून पुनः तुला झाडावर चढण्याची इच्छा होणार नाही असे मला वाटतें. कारण त्याची स- माप्ति हातपाय मोडण्यानेंच व्हावयाची ! "
 लक्ष्मण हंसून ह्मणाला, वाहवा ! ही झालेली दुखापत, माझ्या झाडावर चढण्याच्या इच्छेस प्रतिबंध करील असे मुळींच व्हावयाचें नाहीं ! परंतु दुर्दैवानें मा-