व कॉमडा गेल्यानें किती वेळ झाला हेही तिला
"समजेनासे झाले. यामुळे ती त्या मोलकरणींस पूर्वी-
पक्षांही लौकर उठवून कामास लावू लागली. कधीं
कधीं तर वारा वाजले न वाजले, तोच तिने त्यांस
जागे करावें. येणेकरून त्या मोलकरणींस जास्त
त्रास होऊ लागला हे उघडच आहे.
प्रेमद्वारे प्रत्येकजण आपला वांटा मिळवील,
कलहानें हरएकजण तो खचित् गमबील.
रानालगतच्या एका शेतांत, दोघां मुलांस एक
तित्तिरपक्ष्याचें घरटे आढळले, त्यांतील अंड्यांवर
मादी बसली होती ती त्यांनी हलकेच जाऊन धरली.
त्यांत जो मोठा मुलगा होता तो धाकट्यास
ह्मणाला, तूं अंडी घे, मी आपल्याला ही मादीं
देवतों, अंडी कांही कमी नाहीत, ती मादीच्या किमती-
च्या बरोबरीनेच आहेत. " लहान मुलगा ह्मणाला,
" असे आहे तर, मला मादी दे आणि तूं आपल्याला
अंडी ठेव. " असा त्यांचा वाद चालतां चालतों
अखेरीस हातवांईवर प्रकरण येऊन, एकमेक शै
ड्या ओढू लागले. मांडण्याच्या गडबडीत थोरल्या
मुलाजवळून नाही निसटून गेली, आणि धाकट्यानें
गैरसावधपणात ती अंडी तुडवून टाकलीं, शिलक
कोणासच कांही राहिले नाही, असे पाहून ते परस्परांस