जवळ जामीन मागण्यांत आला. त्याप्रमाणे तो एका
मल्या गृहस्थास घेऊन आला. कोर्टाने चौकशी
केल्यावरून, त्या भल्या गृहस्थानें, मी व्यापारी आहे,
माझें दुकान व इतर इस्टेट चांगली आहे वगैरे आप-
ली माहिती सांगितली. ती ऐकून म्याजिस्ट्रेट ह्मणाले,
" ते सर्व खरें, परंतु कोर्ट तुझाला ओळखत नाहीं ! "
हे गृहस्थही थोडे निर्भीड व विनोदी स्वभावाचेच होते,
यामुळे त्यांची व भ्याजिस्ट्रेटाच कांहीं प्रश्नोत्तरे झाली.
गृहस्थ ह्मणाले, " मला वाटतें या इसमाची व को-
टांची थोडी ओळख असेल, नाहीं बरें ? "
म्पाजिस्ट्रेट झणाले, "नाही, फारशी नाहीं ! हा
ह्या गुन्ह्यांत मजपुढे आला आहे इतकीच कायती ओ-
ळख.
गृहस्थाने विचारले, " आपणापुढे जसजसा जास्त
वेळ गुन्हेगार येत असेल तसतसा तो, आपल्या जास्त
जास्त ओळखीचा होत जात असेल नाही काय ? "
म्याजिस्ट्रेट ह्मणाले, " होय, अशाची चांगली ओ-
ळख ठेवून त्याच्या सामान्य अपराधाबद्दल कोर्टास
त्यास कडक शिक्षा करावी लागते. "
गृहस्थ ह्मणाले, " तर मग कोर्टाच्या पक्का ओळ-
खीचा बनलेला असा लायक इसम जामीन होण्यास
आला पाहिजे की काय ? असे असेल तर कोर्ट मला
ओळखत नाही यांतच मी भूषण मानतों, तें कोर्टा-
च्या ओळखीचें भूषग मला नको ! मी आपला
जातो कसा ! "
आता मात्र चांगला प्रकाश पडून नेत्र दिपल्यामुळे
पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/६५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६१)