Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५५ )

गुरूंच्या मुखानेंच योग्य समाधान झाल्यावर गुरूच्या बापास तरी नाही म्हणवतें काय? गुरुने मुकाट्यानें कंधा (गोवडी ) घेऊन छत्री त्याच्या हवाली केली. ब गोधडीचे सुख काय आहे ते गुरुजीस पावसाळ्यांत चांगलेच समजलें ! !


जेव्हां यमदरबारी न्यायाचा दिवस येईल
तेव्हां प्रत्येकाची लबाडी उघडी होईल.
३७ नांदुर्कीचें झाड.

 कांही वर्षामार्गे वामन आणि यशवंता नांवाचे दोघे तरुण मनुष्य न्यायासनीपुढे आले होते.
 वामन, न्यायाधिशास ह्मणाला,तीन वर्षांपूर्वी, जेव्हा मी प्रवासास गेलो, तेव्हा या यशवंता जवळ, यास मी आपला उत्तम मित्र मानतों, एक हिरेजडीत मौल्यवान् अंगठी ठेवावयास दिली होती; परंतु आतां तो तो माझी मला परत करीत नाही.
 यशवंत, आपला हात छातीवर ठेवून ह्मणाला, " मी सत्यस्मरून सांगतो की, याच्या अंगठीची मला यत्कि चित् देखील माहिती नाहीं: माझा मित्र वोमन या बाबतीत शुद्धं अंतःकरणाचा नसला पाहिजे. " न्यायाधीश ह्मणाला, " वामन, तूं याच्या हवाली अंगठी केलीस या गोष्टीस कोणी साक्षी आहे काय?
 वामन ह्मर्णाला, " शेतांतील त्या जुनाटे नादुर्की- च्या वृक्षाखाली आझी एकमेकांस प्रेमालिंगन देऊन परस्परांचे निरोप घेतले, त्या वृक्षाशिवाय अन्य कोणी