Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५३ )

तेव्हां ग्रामांतरी जाणारा मनुष्य म्हणतो, " मित्रा तुझी मला आठवण राहवी ह्मणून तुझ्या बोटांतील अंगठी तेव्हढी तूं मला देईनास ? "
 स्थाई ( राहणारा ) मनुष्य ह्मणाला, " अंगठी देण्याचें कांहीं कारण दिसत नाहीं; माझें तुला स्मरण असावे एवढाच उद्देश कीं, नाहीं ? तर तो कार्यमाग आतां सहाजी होणार आहे. कसा म्हणशील तर, आतां जेव्हा जेव्हां तं आपलें योट रिकामे पहाशलि तेव्हां तेव्हां तुला माझे स्मरण होऊन ह्मणशील की, भी आपल्या मित्राजवळ अंगठी मागितली परंतु त्यानें ती मला दिली नाहीं.' वरें असो. तुझे मला स्मरण राहण्यासाठी तूं मात्र मला कांही तरी दिले पाहिजेस."
 ग्रामांतरी जाणारा मनुष्य म्हणाला, " त्याचेंही आतां कांहीं कारण उरले नाही. तूं आपल्या अंगठी- चा उपयोग न करितां पेटीत घालून ठेव म्हणजे झाले. तुझे बोट तुला रिकामें दिसले म्हणजे माझे स्मरण तुल अवश्य होईलच ! समाधान पण बिनतोड !!



गुरुजी यापरीचे शिष्य शिटाबबंदरीचे.
३६ गुरुशिष्य.

 गुरुशिष्य दोघे तीर्थयात्रा भ्रमण करीत असतां, गुरूंनी आपले कंधेचे (गोधडीचे ) ओझें शिष्यावर लादण्याची खासी युक्ति लढविली होती. - तुला ओझे होते असे म्हणून सकाळच्या व अस्तमानच्या गा