नच राहिले नाहीं. कांही वेळाने हाताकडे पहाते
तो बांक नाहीं. पाण्यांत वगैरे शोधून पाहू लागली
परंतु सांपडेना, ह्मणून ती फारच आक्रोश करूं लाग-
ली. तेव्हां शेजारीण बाईने तिचे समाधान केले:
ती ह्मणाली, " दूध आणि पाणी यांच्या मिश्रणाने
तूं पैसा जमविलास, दुधाचा हक्काचा अर्धा पैसा तुझ्या
हातांत राहिला, पाण्याचा हरामाचा अर्धा पैसा ज्याचा
त्याने नेला, यांत तुझें काय गेलें ? पापसाधनार्थ श्रम
कलेस, ते तुझ्या पदरी राहिलेच त्याजविषय नूं आतां
रड, आणि असा भ्रष्टाचार करण्याचें सोड ह्मणजे
झालें. " योग्य समाधान झाल्यावर गवळणबाईची सम-
जूत कां बरें होणार नाहीं?
दोघां लोभी मनुष्पांची मैत्री जमली होती. लोभी
मनुष्यांच्या मैत्रीत उभयतांस गोड भाषणापलीकडे दुसरा
कोणता लाभ होणार आहे बरे ! एक आपल्या मथुर
माषणाने दुसऱ्यास फसवूं पाहील तर, एक सोनार क
दुसरा झारेकरी बनणार; तेथे कोणाची कोणाजवळ
लटपट चालणार ? असो. या। उभयतांची बरेच
दिवस मैत्री चालून एकास ग्रामांतरी जाण्याचा प्रसंग
आल्याकारणाने त्यांचा वियोग होण्याची संधि आली.